Home महत्वाची बातमी आहो आश्चर्य , पतीनेच आपल्या पत्नी वर मित्रांच्या मदतीने केला बलात्कार ,

आहो आश्चर्य , पतीनेच आपल्या पत्नी वर मित्रांच्या मदतीने केला बलात्कार ,

59
0

अमीन शाह

मुंबई , दि. २६ :- मित्रांसह पतीनेच आपल्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली
आहे. ही घटना मुंबई येथील जोगेश्वरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पतीसह त्याच्या 2 मित्रांना शनिवारी संध्याकाळी अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तिघांनाही आज वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले घडलेल्या या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

पीडित महिला ही वसई येथे राहत असून गेल्या सहा महिन्यांपूर्वी तिचे आरोपीसोबत लग्न झाले होते. मात्र, या दोघात शुल्लक कारणांवरून वाद होऊ लागले होते. यातून आरोपीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तसेच दोन महिन्यापूर्वी हे दोघेही वसई येथून जोगेश्वरी येथे राहण्यासाठी आले होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या मित्रासह आपल्या पत्नीवर बलात्कार केला. तसेच या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून पीडिते कडे घटस्फोटाची मागणी करू लागला. याशिवाय हा प्रकार कोणालाही सांगितला तर जिवे मारण्याची धमकी आरोपींनी तिला दिली. जीवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी आपल्या मित्रासह तिच्यावर मानसिक व शाररिक शोषन करत होता.

याच कारणांवरून पीडिताने अखेर वसई येथील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी तिघांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत तिन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आज त्यांना वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. अशी माहिती मिळाली आहे .