Home विदर्भ नारी रक्षा समितीचे सदस्य तथा समाजसेवक सुकांत वंजारी याचा अपघात.

नारी रक्षा समितीचे सदस्य तथा समाजसेवक सुकांत वंजारी याचा अपघात.

45
0

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यां वाहनाने दिली जबर धडक

यवतमाळ , दि. २६ :- जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास अकोला बाजार येथील अमन इलेक्ट्रॉनिकच्या समोर हा भीषण अपघात घडला.गणेश के. पाटील यांच्या मालकीची असलेली अवैद्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझर एम.एच.२९ जे.००४२ या वाहनाच्या चालकाने विरुध्द चुकीच्या दिशेने निष्काळजीपणे वाहन चालवित असतांना सुकांत वंजारी यांच्या वाहनाला धडक दिली.

धडक ईतकी भिषण होती कि सुकांत वंजारी यांच्या डाव्या पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना व त्याचे लहान बंधु अमोल वंजारी यांना अकोला बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले व प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना यवतमाळातील शासकिय वैद्यकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.सुकांत वंजारी व अमोल वंजारी बंधु मुलगी पाहण्याकरिता भांबोरा या गावी जात असतांना हा अपघाल झाला अकोला बाजारचे प्रविण मोगरे व गावकऱ्यांनी उपचारासाठी सहकार्य केले.

सदर वृत्त लिहे पर्यंत त्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद व्हायचा होता.

Unlimited Reseller Hosting