Home जळगाव अलहसनात उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अलहसनात उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

83
0

शरीफ शेख

रावेर , दि. २६ :- येथील अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्याध्यापक फिरोज खान समद खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या नंतर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१९ मधील पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. व चित्र कला स्पर्धा २०१७ मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र वाटप करण्यात आले.

सर्व विद्यार्था व शिक्षकांनी संविधानाच्या प्रस्तावने चे वाचन केले. उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक फिरोज खान समद खान व उप शिक्षक युनुस खान, जाकीर हुसेन, शेख कुरबान, शोएब मोहम्मद, इमरान शेख, अंसारी मुख्तार अहेमद, जुल्कर खान , शेख शरीफ , शेख तन्वीर आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.