Home आध्यात्मिक मिनी पंढरी श्रीक्षेत्र घोराड येथे उसळला भक्तांचा जनसागर .!

मिनी पंढरी श्रीक्षेत्र घोराड येथे उसळला भक्तांचा जनसागर .!

248

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

253 दिंड्याचा सहभाग, पालखी सोहळ्याचे आयोजन

वर्धा , दि. २६ :- जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र घोराड येथे पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली होती यात 253 भजनी दिंड्याचा सहभाग होता हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची उसळलेली गर्दी पाहता प्रती पंढरीत जणू भक्तांचा जनसागर लोटल्याचे चित्र निर्माण झाले होते
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत केजाजी महाराज यांच्या 113व्या पुण्यतिथीनिमित्त 17 जानेवारी पासून येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सप्ताहभर दररोज सकाळी आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सप्ताह,किर्तन, प्रवचन, आदी कार्यक्रम पार पडले येथे शुक्रवारी महाराजांचा महानिर्वाण दिवस साजरा करण्यात आला शनिवारी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी 10 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरवात झाली यात सहभागी महाराजांच्या अश्वाचे पुजन ह भ प विठ्ल महाराज भादंककर यांचे हस्ते करण्यात आले यात जिल्यातील नव्हे तर इतर जिल्ह्यातील अशा 253 भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या विवीध वेशभूषा धारण केलेली मुले आणि भाविक, हरीनामाचा गजर करीत टाळ मृदंगाचे तालावर नाचणारी वारकरी मंडळी, पाहता गावातील वातावरण भक्तिमय झाले होते दुरून दूरून भक्तगण हा हा सोहळा पाहण्यासाठी आल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता मंदीरातून निघालेली पालखी मंदिरास प्रदक्षिणा घालत नामदेव महाराज समाधी मंदिर स्थळावर गेल्यावर तिथे रिंगण सोहळा पार पडला या रिंगण सोहळ्यातविणेकरी, पकवाजवादक, डोक्यावर ज्ञानेश्वरी गाथा घेऊन सहभागी झालेल्या महिला ,हातात भगव्या पताका घेत धावा करणारे भाविक तथा अश्वाचे रिंगण पाहता हा अभूतपूर्व प्रसंग डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती रिंगण सोहळयानंतर पालखि मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत दुपारी चार वाजता मंदीराजवळ येताच या सोहळ्याची सांगता झाली. या पालखी सोहळ्यानिमित्त गावातील तरुणांनी पुढाकार घेत सजवलेले रथ, त्यावर स्वार राधाकृष्ण, शिवाजी महाराज, संत केजाजी महाराज, राम लक्ष्मण सिता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या साकरलेल्या प्रतिकृती या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य ठरले.