Home विदर्भ शिवभोजन योजना राज्यातील उत्कृष्ट योजना ठरेल – पालकमंत्री सुनिल केदार

शिवभोजन योजना राज्यातील उत्कृष्ट योजना ठरेल – पालकमंत्री सुनिल केदार

123
0

सौ .पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा, दि. 26 :- राज्यातील अतिशय गरीब माणसाला अल्प दरात पोषक आहार मिळावा, कुणीही भूकेला राहू नये या उदात्त हेतूने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली शिवभोजन योजना राज्यातील उत्कृष्ठ योजना ठरेल असा विश्वास पालकमंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त केला.

जिल्हा सामान्य रुग्णालयात आज शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्र्याचे हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. त्यांचे सोबत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्यकार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले उपस्थित होते.
शिवभोजन योजनेंअतंर्गत जिल्हयाला शासनाने 200 थाळीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यासाठी शिवभोजन जिल्हा समिती मार्फत दोन केद्राची निवड करण्यात आली असून प्रत्येक केद्राला 100 थाळीचे उद्ष्टि देण्यात आले आहे. यामध्ये आनंदी स्वयसहायता महिला बचत गट यांचे सामान्य रुग्णालय परिसरात तर सत्कार भोजनालयाचे वतीने रेल्वे स्टेशन येथे केद्र सुरु करण्यात आहे.

शिवभोजन केंद्रामधून गरीब व गरजु व्यक्तींना 10 रुपयात 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मुद भात व 1 वाटी वरण अशी जेवणाची थाळी मिळणार आहे. सदर केंद्र दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहील. शासकिय कर्मचारी व ज्या ठिकाणी ही योजना सुरु आहे. तेथील आस्थापनेवरील कर्मचा-यांना सवलतीच्या दरात जवेणास सक्त मनाई असणार आहे. शासनाने महाअन्नपूर्ण ॲप विकसित करुन त्यामध्ये ग्राहकाचा फोटो घेण्यात येतो त्यानुसार लाभार्थ्यांने या सुविधेचा लाभ घेतला याची नोंद ठेवण्याची सुविधा या ॲपमध्ये करण्यात आलेली आहे.

Previous articleरिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे सभासद नोंदणी अभियान संपन्न
Next articleमिनी पंढरी श्रीक्षेत्र घोराड येथे उसळला भक्तांचा जनसागर .!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here