Home रायगड भरदिवसा सोने व्यापा-यावर दरोडा टाकुन १९ लाखाची रोखड लुट करणा-या ०६ दरोडेखोरांना...

भरदिवसा सोने व्यापा-यावर दरोडा टाकुन १९ लाखाची रोखड लुट करणा-या ०६ दरोडेखोरांना ७२ तासांच्या आत गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल, नवी मुंबई कडुन अटक

182
  1. गिरीश भोपी

नवी मुंबई, कळंबोली येथील मॅकडोनल्डचे समोर पुणे मुंबई वाहीनीवरील बस स्टॉपजवळ दिनांक २७/११/२०२१ रोजी शर्मा ट्रॅव्हल्स मधुन अंबेजोगाई येथुन सोने खऱेदी करण्यासाठी आलेल्या व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पुड फेकुन घातक शस्रासह दरोडा टाकुन त्याच्या जवळील १९ लाख रुपयांची लुट करुन पसार झाले होते. सदरबाबत *कामोठे पोलीस ठाणे गु.रजि.क्र. ४६१/२०२१ भा.दं.वि. ३९५,३९७,३४१,१२० (ब) भारतिय हत्यार कायदा कलम 4,25* प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील दरोडेखांपैकी ०६ दरोडेखोरांना ७२ तासांच्या आत गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल नवी मुंबई यांनी अटक करुन लुटलेली सर्व रक्कमेसह गुन्ह्यात वापरलेली घातक शस्त्रे व वाहने हस्तगत केली आहेत.

सदरची घटना घडल्यानंतर घडनेचे गांभिर्य पाहुन तात्काळ मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. महेश घुर्ये एक तासाचे आत घटनास्थळी पोहचले. मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. सुरेश मेंगडे यांनी घटनास्थळी भेट देवुन उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांकडे सखोल चौकशी केली.

मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे यांनी सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, संबंधित पोलीस ठाणे प्रभारी त्यक्षदर्शी साक्षिदारांच्या मदतिने घटनास्थळी गुन्हा कशा पद्धतिने घडला गुन्हा सदृश्य परिस्थितीचा (Scene of offence recreate ) आढावा घेवुन गुन्हा कशा पद्धतिने घडला आरोपी कोठुन कसे पळाले याचे प्रात्यक्षिक करुन आरोपींचा माग, गुन्ह्याची पद्धतीबाबत माहीती प्राप्त केली.

त्यानंतर तात्काळ मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. महेश घर्ये यांनी संवेदनशिलता लक्षात घेता गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिने मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या पर्यवेक्षनाखाली एक विशेष तपास पथक स्थापन केले.

१. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा कक्ष ०२, पनवेल नवी मुंबई.(प्रमुख प्रभारी अधिकारी)
२. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा कक्ष ०१, नवी मुंबई.
३. मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा कडील अधिकारी व अंमलदार.
४. पोलीस नाईक/४४१३ अजिनाथ फुंदे, गुन्हे शाखा.
मा. पोलीस आयुक्त नवी मुंबई, श्री. बिपिनकुमार सिंह, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. महेश घुर्ये, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. सुरेश मेंगडे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. विनोद चव्हाण, श्री. विनायक वस्त गुन्हे शाखा यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते.

सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी गुन्हे शाखा कक्ष 02 यांच्या कडुन समांतर तपास करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे स.पो.नि. प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील यांनी गुन्ह्यातील जखमी इसम, प्रत्यक्षदर्शी साक्षिदार, घटनास्थळावरील प्राप्त सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच पो.ना. आजिनाथ फुंदे, पो.शि. संजय पाटील, प्रविण भोपी यांनी केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारे अतिशय कौशल्यपुर्ण व सलग तपास करुन कोणतेही धागेदोरे नसताना गुन्ह्यातील आरोपी निष्पण्ण करुन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे व कर्नाटक राज्य येथे जावुन अतिशय शिताफिने अद्यापर्यंत खालिल ०६ दरोडेखोरांना अटक केलेली आहे. अटक आरोपींकडुन गुन्हा करतेवेळी वापरलेली ०३ घातक शस्त्रे, फिर्यादी यांची रक्कम ठेवलेली बॅग, गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने व लुटलेली संपुर्ण रक्कम अशी एकुण २२ लाख ५४ हजार एवढ्या रकमेची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

*अटक आरोपींची नावे-* ➡️
१. अनिकेत जोमा म्हात्रे, वय २३ वर्षे, रा. ओवळेगाव, पो. पारगाव, ता. पनवेल जि. रायगड.
२. कार्तिक सुशिल सिन्हा, वय- २४ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. कल्पनानगर, पाषाण लिंक रोड, बानेर पुणे.
३. किरण विजय पवार, वय- २१ वर्षे, धंदा- नोकरी, रा. घोटगाव, पो. कोयनावेळे, ता. पनवेल, जि. रायगड.
४. भिमा रामराव पवार, वय- २१ वर्षे, धंदा- नोकरी, रा. घोटगाव, पो. कोयनावेळे, ता. पनवेल, जि. रायगड.
५. मनोज गुरम्या राठोड, वय-२२ वर्षे, धंदा- मासे विक्री, रा. रुम नं. ५०४४, डॉ. बाबासाहेब आंबडेकरनगर, कफ परेड, कुलाबा, मुंबई.
६. लक्ष्मण सुभाष राठोड उर्फ लकी उर्फ वाघ्या वय-२१ वर्षे, रा. देविचापाडा, तळोजा एम.आय.डी.सी., तळोजा.

सदर आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये नमुदचा गुन्हा हा अटक आरोपी व इतर ०४ पाहिजे आरोपी यांनी टी पॉइंट चिंचपाडा येथील टेकडीवर कट रचुन केलेला आहे. नमुद आरोपिंनी फिर्यादी यांचा माग काढुन त्यांच्यावर घातक शस्त्राने हल्ला करुन सदरचा गुन्हा केलेला आहे.

गुन्ह्यातील फिर्यादी हे अंबेजोगाई बिड येथील सोन्याचे व्यापारी असुन अंबेजोगाई येथे प्रत्येक शनिवारी मार्केट बंद असल्याने ते शुक्रवारी रात्री सोने खरेदी करण्यासाठी अंबेजोगाई येथुन खाजगी ट्रॅव्हल्स बस ने मुंबई येथे येत असत. त्यावेळी फिर्यादी हे प्रत्येक शनिवारी कळंबोली येथील मॅकडोनल्ड समोर सकाळी ०७.०० वा. च्या सुमारास उतरुन ते अटक आरोपी अनिकेत म्हात्रे याच्या परिचयाच्या व्यक्तिकडे फ्रेश होण्यासाठी जात असत, त्यांनतर ते सोने खरेदी करुन पुन्हा संध्याकाळी खाजगी ट्रॅव्हल्स बस ने मुळगावी परत जात असत. सदरची माहीती अटक आरोपी अनिकेत म्हात्रे याने त्याच्या इतर साथिदारांना सांगीतली त्यानुसार त्यांनी नमुद फिर्यादी यांना दरोडा टाकुन लुटण्याचा कट रचला.

सदर कट अमलात आणण्यासाठी अटक व पाहीजे आरोपी यांनी दि. 20/11/2021 रोजी प्रयत्न केला होता, परंतु एस.टी. महामंडळाच्या संप बंदोबस्त कर्तव्याकरीता मॅकडोनल्ड व त्यासमोरील बस स्टॉप येथे स्थानिक पोलीसांचा बंदोबस्त असल्याने तो अमलात येवु शकला नाही.

त्यानंतर पुन्हा दि. २७/११/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वा. नमुद अटक व पाहिजे आरोपी यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त सो. गुन्हे यांच्या आदेशान्वये विशेष तपास पथकाने, गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, पो.ना. अजिनाथ फुंदे, सफौ. सुदाम पाटील, पो.हवा. प्रशांत काटकर, मधुकर गडगे, अनिल पाटील, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, सचिन पवार,जगदिश तांडेल, राजेश बैकर पो.ना. इंद्रजित कानु, रुपेश पाटील, निलेश पाटील, सचिन म्हात्रे, राहुल पवार, प्रफुल्ल मोरे, दिपक डोंगरे, नंदकुमार ढगे, अभिजित मे-या, पो.शि. संजय पाटील, प्रविण भोपी, विक्रांत माळी यांनी केलेली आहे.