Home विदर्भ वृक्षारोपण कार्यक्रमात बायफ संस्थेतील सीआरपि यांचे योगदान

वृक्षारोपण कार्यक्रमात बायफ संस्थेतील सीआरपि यांचे योगदान

156

नरेन्द्र कोवे 

यवतमाळ – राळेगाव तालुक्यातील देवधरी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या बायफ संस्थेतील सीआरपी बंडू भारसाकरे यांचे वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.


ग्राम पंचायत देवधरी येथे दिनांक 11 ऑगस्ट रोजी बायफ संस्थेतील सीआरपी श्री. बंडू भिमाजी भारसाकरे ह्यांनी वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
आज देवधरी गावामध्ये सामूहिक वनाधिकार मिळालेल्या वनजमिनिवर वनांचल समृद्धी अभियान कडून वृक्षारोपण करण्यात आले. मुख्यतः फळझाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये चिंच मोह आवळा अशी झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमाला वसा संस्थेचे संस्थापक संचालक पंकज पाठक मुंबई वरून आले होते तर वसा विभाग समनव्यक विलास बोरसे उपस्थित होते.
वसा जिल्हा समनव्यक आकाश अंभोरे यांनी प्रास्ताविक केले तर पंकज पाठक यांनी वृक्षांचे महत्व व लागवड पद्धती सांगितली
आभार तालुका समनव्यक यांनी केले.वृक्षारोपण कार्यक्रमाला वनजमिनिवर वृक्षारोपण साठी मा. प्रितिताई काकडे(जि.प.सदस्या) स्वतः उपस्थित होत्या. यावेळी गावकऱ्यांनी ग्रामसहभागातून जंगलात ही सर्व झाडे लावली. व गावकऱ्यांनी पुढील 500 झाड वनजमिनित लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार व पूर्ण झाड जगवण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. याबद्दल पंकज पाठक यांनी गावकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
सदर कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मा. संजयभाऊ काकडे सहभागी झाले होते .तसेच गावातील
महादेव पंजाबराव टेकाम- वसा फाउंडेशन तालुका समन्वयक,राळेगाव, बेबीताई रामाजी कोवे- उमेद, उडान महिला ग्राम संघ, किशोर भीमराव आत्राम- शिपाई ग्राम पंचायत देवधरी, मनीषा बंडू भारसकरे,सुरेखा चंपत बावणे, मारोती किशनजी भोयर, भिवा भिकाजी चव्हाण, सुरेश कवडुजी हरदे, अनिल वसंता टेकाम,
आदि ग्रामस्थांची उपस्थित लाभली होती.