Home विदर्भ “15 ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबीराचे शिवशक्ती लॉन मध्ये आयोजन

“15 ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबीराचे शिवशक्ती लॉन मध्ये आयोजन

201

यवतमाळ – मागील 6 वर्षापासून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी शिवशक्ती लॉन स्टेट बँक चौक यवतमाळ येथे भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन एस. के. ऑटोडिल मित्रपरिवार च्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून या विशाल रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी हनुमान मंदीर समिती, जयहिंद उत्सव मंडळ, मास्क क्रिएटीव्ह कल्चर क्लब, लॉयन्स क्लब यवतमाळ, इनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ ज्वेल्स आदि प्रयत्नशिल असून कोरोना संसर्ग महामारी दरम्यान सुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात एस. के. ऑटोडिलचे संचालक शैलेश करिहार यांचा सिंहाचा वाटा असून दि. 15 ऑगस्ट रोजी होणार्‍या या महारक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी या प्रकल्पाचे मुख्य संयोजक शैलेश करिहार 9822567899 यांच्याशी संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे.