Home मराठवाडा शिवसैनिक ताकद दाखवून देतील – वरूण सरदेसाई

शिवसैनिक ताकद दाखवून देतील – वरूण सरदेसाई

260

जालना- लक्ष्मण बिलोरे

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक आपली ताकद दाखवून देतील.जालन्यातून अर्जुन खोतकर यांना लोकसभेवर निवडून देण्याची जबाबदारी युवा सैनिकांची असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य सचिव वरूण सरदेसाई यांनी गुरुवारी,१२ आॅगष्ट रोजी येथे केले.मातोश्री लाॅन्स युवा सेना पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले,माजी आमदार शिवाजी चोथे, संतोष सांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर,एजे बोराडे, शहर प्रमुख विष्णु पाचफुले, डॉ.आत्मानंद भक्त, युवा सेना राज्य विस्तारक, अभिमन्यू खोतकर, राज्य कार्यकारिणी सदस्य आदित्य शिरोडकर आदिंची उपस्थिती होती.