Home मराठवाडा जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड

जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड

726

जालना- लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी ३ या प्रमाणे २४ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. राज्याचे कुटुंब कल्याण व आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेश टोपे यांच्या हस्ते दि.१५ऑगस्ट रविवार रोजी या ग्रामपंचायतींना प्रथम,द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्रदान करून सदर ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे.रोख रक्कम, सन्मानपत्र आणि ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप राहणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सौ.पूजा कल्याण सपाटे व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले आहे.