Home औरंगाबाद क्रेडिट कार्ड चे हफ्ते थकले म्हणून महिले कडे केली शरीर सुखाची मांगणी,

क्रेडिट कार्ड चे हफ्ते थकले म्हणून महिले कडे केली शरीर सुखाची मांगणी,

560

 

पोलीस विभाग लागला कामाला , 

अब्दुल कय्युम

औरंगाबाद, 04 ऑगस्ट: क्रेडिट कार्डचं बिल थकलं म्हणून एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. पीडित महिलेकडे एका नामांकित बँकेचं क्रेडिट कार्ड होतं. पण मागील दिवसांपासून त्यांनी क्रेडिट कार्डचं बिल भरलं नव्हतं. त्याच्या क्रेडिट खात्यावर एकूण वीस हजार रुपयांची थकबाकी होती. या पैशांच्या बदल्यात आरोपी कर्मचाऱ्यांनं महिलेकडे थेट शरीरसुखाची मागणी केली आहे. याप्रकरणी महिलेनं पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
खरंतर, औरंगाबाद येथील एका बँकेनं आपल्या ग्राहकांकडील थकीत कर्ज आणि हफ्ते वसुल करण्याचं काम एका थर्ड पार्टीला दिलं आहे. दरम्यान वसुली कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं क्रेडिट कार्डच्या बिलाच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. याशिवाय आरोपीनं महिलेला शिवीगाळ देखील केल्याचा आरोप पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत केला आहे.

क्रेडिट बिलची वसुली करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने अश्लील शब्दांत मसेज केल्यानंतर पीडित महिलेनं  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष करत कोणतीही कारवाई केली नसल्याचंही फिर्यादीनं म्हटलं आहे. यानंतरही आरोपी कर्मचाऱ्यानं आपलं कृत्य थांबवलं नाही. क्रेडिट कार्डच्या थकीत बिलासाठी आरोपीनं पीडित महिलेकडे थेट शरीरसुखाची मागणी केली.

वसुली कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं औरंगाबाद शहरातील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला. शिवाय अश्लील मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीच्या तपासाच्या नावाखाली पोलीस फिर्यादी महिलेच्या पतीला दिल्लीला घेऊन गेले, असा आरोपही पीडित महिलेनं केला आहे. या घटनेचा पुढील तपास सिडको पोलीस करत आहेत.

 

संबंधित महिलेची तक्रार मिळाली असून आम्ही तपास सुरू केला आहे ,

पोलीस विभाग ,

 

आम्ही वसुली चे काम कंत्राट पद्धतीने दिले आहे लवकरच चौकशी करून प्रतिक्रिया देऊ ,

बँक प्रशासन ,