Home महत्वाची बातमी करायला गेलं काय ? अन , झालं काय ?

करायला गेलं काय ? अन , झालं काय ?

2614

 

अखेर तो सिंघम पोलीस कर्मचारी निलंबित , ???

 

अमीन शाह ,

पोलीस कर्तव्य बजावत असतांना हातात पिस्तुल घेवून सिंघमपणा एका पोलीस शिपायाच्या चांगलाच अंगलट आला असून त्याला या प्रकरणी निलंबित केले आहे . अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार पोलिस स्टेशनमधे कार्यरत पोलिस शिपाई मंगेश मधुकरराव काळे ( ब.क्र २४१३ ) यांनी पोलिस वर्दीमधे हातात पिस्तुल घेवुन , बाजीराव सिंघम सारखी डायलॉगबाजी करत , व्हिडिओ तयार केला आणि हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला . पोलीस शिपाई / २४१३ महेश मुरलीधरराव काळे , नेमणुक पोलीस स्टेशन चांदुर बाजार यांनी शासकीय गणवेषामध्ये हातात पिस्टल सारख्या शस्त्राचा वापर करुन व्हिडीओ तयार केला . तसेच सदरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला . यातुन आपण शासकीय गणवेषावर शस्त्राचा धाक दाखवल्याचे निश्पन्न होत आहे . शासकीय गणवेषाचा आणि शस्त्राचा चुकीचा गैरउपयोग करुन सोशल मिडीयावर व्हिडीओ प्रसिध्द केला . आपल्या या कृत्यामुळे पोलीस दलाची जनमानसात बदनामी होऊन पोलीसांची प्रतिमा मलीन झाली आहे . आपल्या कृतीचा ईतर पोलीस कर्मचारी व सामान्य नागरीक यांच्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारत येत नाही . आपण आपल्या कर्तव्यामध्ये अत्यंत बेशिस्त , बेजबाबदार व निष्काळजीपणा केलेला असल्यामुळे आपणास मुंबई पोलीस ( शिक्षा व अपिल ) नियम १ ९ ५६ मधील नियम ३ ( १ ) ( अ -२ ) मधील तरतुदीनुसार व पोलीस अधिनियम १ ९ ५१ मधील कलम २५ ( ख ) नुसार आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासुन पासुन निलंबीत करण्यात आले आहे ,