
सायबर सेल ची कामगिरी ,
अमीन शाह
बुलडाणा ,
जिल्हा पोलिस दलात कार्यरत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर अश्लील चित्रे व्हायरल केली होती. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून 18 जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 3 ऑगस्ट रोजी सायबर सेलने तपास केल्यानंतर एका आरोपीला या प्रकरणात अटक केली आहे. जिल्हा पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली होती या कृत्याबाबत पोलीस प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित महिलेच्या तक्रारीवरून, 18 जुलै रोजी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून या प्रकरणाच्या पुढील तपासाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सायबर सेलवर सोपवण्यात आली होती. सायबर सेलने या घटनेचा तपास करून २४ वर्षीय सुनील संजय काळे उर्फ लिंबू याला ३१ ऑगस्ट रोजी शहरातील भीम नगर भागातून अटक केली असल्याची माहिती मिळाली असून आरोपींच्या चौकशीदरम्यान आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे उघड झाले. सायबर सेल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.











































