Home विदर्भ स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान मध्ये पुसद जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणारी...

स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान मध्ये पुसद जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणारी नगरपालिका तर देशात 55 वा क्रमांक

743

ऍड.भारत जाधव यांच्या आरोग्य सभापती कार्येकाळातील पुसद शहरास उपलब्धी…

यवतमाळ ,  पुसद -/ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थानिक नगरपालिकेच्या आरोग्य सभापती पदावर आरूढ असलेल्या ऍड.भारत मधुकर जाधव यांच्या कार्येकाळात नगरपालिकेस संपूर्ण देशात 55 वा,अमरावती विभागातून 5 वा क्रमांक तर यवतमाळ जिल्यात प्रथम क्रमांक मिळवीत विशेष प्रोत्साहन विकास निधीवर आरोग्य विभागाने मोहर उमटविली आहे.


◆शहरातील स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत तब्बल एक कोटी पन्नास लाख रुपयांचा प्रोत्साहन निधी नगरपालिकेस मिळवून दिला. 2019 मध्ये हागणदारीमुक्त (ODF) शहराचे मानांकन नगरपालिकेस मिळाले. तसेच 2020 मध्ये अधिकचे एक विकासात्मक पाऊल टाकीत शहरास ODF + मानांकन प्राप्त झाले. याच विकासाची कास राखीत यावर्षी ODF ++ मानांकन मिळविणारे पुसद शहर हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रथम शहर ठरले.
यापूर्वी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देश पातळीवर शहराचा 376 वा क्रमांक होता मात्र कुशल स्वच्छतेचे नियोजन करीत वर्तमान स्थितीत देश पातळीवर 55 वा गुणांकन क्रमांक तर अमरावती विभागात 5 वा व जिल्ह्यात प्रथम गुणांकन क्रमांक प्राप्त करीत माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईकांचा पदस्पर्श लाभलेल्या पुसद नगरपालिकेचा अग्रणी ऐतिहासिक वारसा अबाधित ठेवीत देशात वैकासिक दृष्ट्या नावलौकिक मिळवून दिला आहे.

◆डम्पिंग ग्राउंडवर (संखात केंद्रावर) केलेली विकासात्मक कामे-

◆1,ओला व सुका कचरा प्रक्रिया केंद्र उभारणी ( MRF- Material recovery fidelity.) 2, घरगुती मैलाची विल्हेवाट लावण्याकरिता मल निस्तारण प्रक्रिया केंद्र उभारणी.
3, शास्त्रोक्त पद्धतीने (बायो मायनिंग) अंतर्गत 6 हजार 900 क्यूबिक मीटर जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता 1 कोटी पन्नास लाख रुपये मागणीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.
4,संखात केंद्रावर ग्रीनबेल्ट निर्माण करण्यात आला.
5,कचरा विलगीकरनासाठी श्रेडिंग व वेब्रिज मशिनरी लवकरच इंस्टोल करण्यात येईल.
6, पंधरावा वित्त आयोगातून संखात केंद्राकरिता सरंक्षण भिंत उभारणीसाठी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
7, IEC द्वारे शहरातील स्वच्छता जनजागृती करिता निविदा प्रकाशित करण्यात आली असून लवकरच अंमलात येईल असे पत्रकार परिषद समई ते बोलले

◆स्वच्छतेच्या बाबतीतील उद्दिष्टे-◆

GFC-कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन मिळवून देणे.,संपूर्ण शहराचे विलोभनीय सौंदर्यीकरण करणे.,भूमिगत गटार योजनेअंतर्गत शहरात प्रकल्प उभारून त्यामधून निघणाऱ्या अस्वच्छ सांड पाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ पाणी नदी पत्रात सोडणे, याकामी पात्र संस्था/एजन्सी नियुक्त करण्याकरिता लवकरच जाहिरात प्रकाशित करण्यात येईल.,शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयात 24 तास वीज पुरवठा व पाणी पुरवठासह सर्व सुविधायुक्त बनविणे., शहरातील मुख्य रस्त्याची रात्रपाळी नियमित साफसफाई करणे,,वर्तमान पावसाळ्यात डास व इतर हानिकारक जीवजंतूंचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण शहरात औषध फवारणी करणे., मुख्य बाजारपेठेत मोबदल्यात वापरा/ पे & युज पद्धतीने BOT तत्वावर 3 अत्याधुनिक शौचालय उभारणी करणे.
◆शहराच्या भविष्यकालीन विकासासाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा -ऍड.भारत जाधव

जन अरोग्य संवर्धन हेतूने कुणीही उघड्यावर शौचास जाऊ नये., आपापल्या घरगुती कचऱ्याचे विलगीकरण करून ठेवणे.,घरगुती कचरा हा उघड्यावर न टाकता केवळ नगरपालिकेच्या घंटा गाडीतच टाकावा., पर्यावरणाची हानी रोखण्या हेतूने जनतेने प्लास्टिक पिशव्यांचा वापर शक्यतोवर टाळावा.,फेरीवाले व दुकानदारांनी कचरा हा नगरपालिकेच्या घंटा गाडीतच टाकावा जेणेकरून कार्येवाहीची वेळ येणार नाही असही भारत जाधव या वेळी म्हणाले

आजवर माझ्या आरोग्य सभापती कार्येकाळात शहरास स्वच्छ ठेवण्यासाठी मुख्य बाजारपेठेत महिला पुरुष शौचालय व मुतारी घराची निर्मिती,नगरपालिकेच्या प्रांगणात कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून सॅनिटायझर कक्षाची उभारणी, धार्मिक स्थळे व बाजारपेठेतील 1700 व्यापारी प्रतिष्ठानास *dastbin चे वितरण करून पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.स्थानिक नगराध्यक्षा सौ.अनिताताई नाईक, उपाध्यक्ष तसेच प्रभारी नगराध्यक्ष डॉ.अकिल मेमन साहेब,मुख्याधिकारी डॉ. किरण सुक्कलवाड* समस्त शहरवासीय,सर्व सहकारी नगरसेवक व विरोधीपक्ष, आरोग्य विभागातील समस्त कर्मचारी तथा सफाईकामगार बांधव यांचेसह तांत्रिक बाबतीत मोलाचे सहकार्य करणारे आरोग्य अभियंता भूषण चव्हाण, आरोग्य निरीक्षक धिरज जाधव,शहर समन्वयक दर्पण राठोड या सर्वांचे मनःपूर्वक आभार ऍड.भारत जाधव आरोग्य सभापती यांनी पत्रकार परिषद मध्ये मानले