Home जळगाव मुक्ताईनगर गटविकास अधिकाऱ्यांकडून वृत्तसंकलंन करण्यास गेलेल्या पत्रकारास गुन्हा दाखल करण्याची धमकी :...

मुक्ताईनगर गटविकास अधिकाऱ्यांकडून वृत्तसंकलंन करण्यास गेलेल्या पत्रकारास गुन्हा दाखल करण्याची धमकी : तालुक्यातील पत्रकारांकडून घटनेचा निषेध ! मग्रूर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी !

475
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगरचे गटविकास अधिकारी असलेले संतोष नागटीलक यांच्या कडून वृत्तसंकल करण्यास गेलेल्या पत्रकारांस दमबाजी करत माज्या बद्दल बातमी लावायला कोणी सांगितलं, आताच तुज्यावर गुन्हा दाखल करतो या भाषेत आवाज दडपण्याचा व लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला या कृत्यामुळे पत्रकारांमध्ये घबराटीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्या अधिकाऱ्यांवर बदलीच नव्हे तर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा वृत्तसंकलंन करणे अवघड होईल…

याबाबत अधिक असे, मुक्ताईनगर येथील मंडे टू मंडे चे स्थानिक पत्रकार अक्षय काठोके यांनी चांगदेवचे ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी यांच्या कार्यालयात हजर राहत नाही, नागरिकांना अर्वाच्य भाषेत बोलतात, नियमानुसार ड्युटीच्या गावी रूम घेऊन राहणे बंधनकारक असतांना ते ड्युटी च्या गावी न राहता बाहेर गावावरून ये-जा करता आशा मनमानी कारभाराबाबत व गटविकास अधिकाऱ्यांच्या जुन्या आदेशावरील तारीख खोडत या वर्षाची तारीख पेनाने लिहून खोटी आदेशाची पत्र दाखवत बनावट पत्र दाखवत नागरिकांची खुशाल दिशाभूल केली. हा सर्व प्रकार गटविकास अधिकारी संतोष नागटीलक यांच्या निदर्शनास आणून दिला मात्र, लक्षात आणून देऊनही गटविकास अधिकारी संतोष नागटीलक हे नेमक्या कोणत्या हेतूने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करुन संबधित ग्रामसेवकाची पाठराखण करीत आहेत, तसेच एक महिला ग्रामसेवकांकडे गेली असता आमचं कोण काय वाकड करून घेईल… त्या बातमी लावणाऱ्याला गट विकास अधिकाऱ्याकडे बोलून पाहून घेऊ… असा दम दिला, यावर गट विकास अधिकारी यांच्या कडून कुठली चौकशी वा कारवाई होत नसल्याचे दिसून आल्याने यासंदर्भात ग्रामसेवकावर चौकशी करून कारवाई का केली जात नाही ? त्यांना पाठिशी का घातलं जातंय ? असे विचारत प्रतिक्रिया मागितली असता त्यांना या गोष्टीचा राग येऊन पत्रकार काठोके यांना अर्वाच्च भाषा वापरत तुला मध्ये कोणी येऊ दिल, आणि माज्या विरुद्ध बातम्या लावायला तुला कोणी सांगितलं… तुज्यावर आताच गुन्हा दाखल करेल…! अशी दमदाटी करत अपमानास्पद वागणूक देत धमकी दिली एका वृत्तसंकलंन करणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सदरील अधिकाऱ्याकडून केला गेला. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. या कृत्यामुळे पत्रकारांमध्ये घबराटीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

पत्रकारास झालेल्या अन्यायाच्या वास्तव माहिती तालुक्यातील पत्रकारांना घडलेला सर्व मजकूर संबधी उपस्थित पत्रकारा समोर मांडला, असा सर्व मजकूर ऐकल्यानंतर सर्व पत्रकाराच्या विचारा नुसार एकमत होऊन. घटनेचे गांभीर्य व संबंध हा वृत्त प्रकाशित करण्याशी तसेच सबंधी अन्याय ग्रस्त हा पत्रकार असल्यामुळे गट विकास अधिकारी संतोष नागतीलक यांनी केलेले वर्तन हे त्यांना शोबनीय नसल्यामुळे त्यांचा प्रकार हा लोक शाहीच्या चौथ्या स्थम्भाला दडपण्याचा हेतूने केलेला असल्याने जर असेच अधिकारी पत्रकारांना धमक्या देत असतील तर पत्रकार संरक्षण कायदा काशासाठी ? एकंदरीत पत्रकारांच्या आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असून उपस्थित सर्व पत्रकाराच्या वतीने संबधीत घटनेचा निषेध नोंदवन्यात आला व सदरील अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास सर्व पत्रकारांच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक, तहसीलदार दालनातील तायडे मॅडम, रोहिणी ताई खडसे यांना देण्यात आले निवेदन देतांना अक्षय काठोके (प्रतिनिधी- मंडे टू मंडे ), अतिक खान वार्ताहर (वायरल न्युज), अक्षय पालवे वार्ताहर (अहिल्याराज ),शाकीर शेख (कृषी समृद्धी टीव्ही), रवी गोरे (Tv9), किरण पाटील( स्वराज्य टीव्ही मराठी), योगेश पाटील (जे डी महाराष्ट्र )न्युज, विनोद बेलदार (खान्देश विश्व्वेध), सतीश गायकवाड (महाराष्ट्र दर्पण )न्युज, पंकज तायडे (इंडिया न्युज,) विठ्ठल धनगर (मुक्ताई लाईव्ह )मोहन मेढे (लोकशाही,) प्रमोद सौंदले (नजरकैद )आदी पत्रकार उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रति. आ.चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर विधानसभा), खासदार. रक्षा खडसे (रावेर लोकसभा )
अँँड. रोहिणी खडसे-खेवलकर (अध्यक्षा-जिल्हा बँक, जळगाव), श्री.एकनाथराव खडसे (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), श्री.रामकृष्ण पवार (पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर), डॉ.बी. एन. पाटील (मुख्य अधिकारी ZP, जळगाव), डॉ.श्री. अभिजित राऊत (जिल्हाधिकारी,जळगाव) यांना प्रति पाठवण्यात आल्या.

Previous articleस्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान मध्ये पुसद जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणारी नगरपालिका तर देशात 55 वा क्रमांक
Next articleनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे –  डॉ. राजन माकणीकर
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.