Home मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे –  डॉ....

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे –  डॉ. राजन माकणीकर

106
0

मुंबई ,  (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतिने राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केली आहे.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे तमाम वंचित, बहुजन, शेतकरी, कष्टकरी जणांचे कैवारी असून भारत भाग्य विधाते आहेत. खऱ्या अर्थाने शेतकरी कष्टकरी व महिलांचेच नसून या भारत देशाचे तारक आहेत.

याच रायगडाच्या पावन भूमी तुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांती घडवली आहे. बाबासाहेब आंबेडकारांच्या कार्याचे अनेक दाखले या भूमीतून इतिहासात पाहायला मिळतात, त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची ऐतिहासिक भूमी म्हणून रायगडाला ओळखले जाते.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवरायांचे नाव देऊन जसा गौरव करण्यात आला तसाच नवी मुंबई विमानतळाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन गौरविण्यात यावे. हीच बाबासाहेबांच्या कार्याला या सरकार कडून खरी आदरांजली होईल, असा मनोदय पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या युवा व अभ्यासू नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ कांबळे, भाई विजय चव्हाण, भाई शिवा राठोड, राजेश पिल्ले यांच्या सह लवकरच एक शिष्टमंडळ सदरचा प्रस्ताव सरकार कडे दाखल करणार असल्याची माहिती कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी दिली.

Previous articleमुक्ताईनगर गटविकास अधिकाऱ्यांकडून वृत्तसंकलंन करण्यास गेलेल्या पत्रकारास गुन्हा दाखल करण्याची धमकी : तालुक्यातील पत्रकारांकडून घटनेचा निषेध ! मग्रूर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी !
Next articleपेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या तुलनेत कृषी खर्चातील वाढ कमी नाहीच – शैलेश अग्रवाल
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.