Home परभणी पाथरी तहसील कार्यालयात माहिती अधिकार कार्यकर्त्याला अपमानजनक वागणूक

पाथरी तहसील कार्यालयात माहिती अधिकार कार्यकर्त्याला अपमानजनक वागणूक

713

 अहमद अन्सारी  – पाथरी

परभणी – एका आरटीआय कार्यकर्त्यांने पाथरी तहसील कार्यालयाकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. निवेदनावर केलेल्या मागण्याकडे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याने यावर प्रत्युत्तरात काय कार्यवाही करण्यात आली. हे विचारण्यास गेलेल्या आरटीआय कार्यकर्त्यास तहसील कार्यालयात अपमानास्पद वागणूक मिळाली. ( दिंनाक 03/06/2021 रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते अहमद अन्सारी हे आपल्या सहकाऱ्यासह तहसीलदार श्रीकांत निळे यांच्या दालनात पोहोचले होते. यावेळी अहमद अंसारी यांनी दिलेल्या निवेदनावर काय कारवाई करण्यात आली अशी विचारणा केली असता “बाहेर व्हा चालते व्हा” असे म्हणून हाकलून दिले असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांला देण्यात आलेली वागणूक अपमानजनक आहे. अशाप्रकारे वरिष्ठ अधिकारीच वागणूक देत असतील तर सामान्य माणसांनी जायचे कुणाकडे असा प्रश्न सर्वसामा?न्यांना नक्कीच पडला असेल?. अशा या मिळालेल्या वागणुकी पोटी माहिती अधिकार कार्यकर्ते अहमद अन्सारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी तहसीलदार श्रीकांत निळे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर कार्यवाही न झाल्यास 15 दिवसानी लोकशाही मार्गाने तीव्र आॅदोलन करण्यात येईल असे निवेदनास म्हटले आहे.