Home मराठवाडा राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक परीक्षेत सौ.प्रियंका चव्हाण उत्तीर्ण

राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक परीक्षेत सौ.प्रियंका चव्हाण उत्तीर्ण

194

जालना- लक्ष्मण बिलोरे

ऑल इंडिया चेस फेडरेशन मार्फत राष्ट्रीयस्तर आयोजित “चेस इन स्कूल”या बुध्दीबळासाठी राष्ट्रीय स्तरावर शाळांमध्ये प्रशिक्षण देण्याकरिता विशेष परीक्षेचे आयोजन देशातील सर्व राज्यामध्ये करण्यात आले होते.यासाठी विविध गटामध्ये खेळांडूचे वर्गीकरण करण्यात आले होते.सहाव्या गटामध्ये सौ.प्रियंका चव्हाणचा समावेश करण्यात आला होता.या गटाला ग्रँँडमास्टर श्रीराम झा,आंतरराष्ट्रीय मास्टर दिनेश शर्मा, आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी यांनी मार्गदर्शन केले.या शिबीराचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर आॅनलाईन दिनांक 10 ते 13 एप्रिल 2021 दरम्यान चार दिवसांचे करण्यात आले होते. यात देशातून जवळपास तीन हजारापेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला होता.या परिक्षेत देशातुन फक्त साधारणता 17% परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे. दिनांक 3 मे 2021 ला झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील आॅनलाइन परीक्षेचे निकाल दिनांक 4 जून 2021 ला जाहीर करण्यातआले . यात बुलढाणा जिल्ह्यातील चव्हाण चेस अकॅडमीच्या संचालिका सौ.प्रियंका चव्हाण ने अतिशय खडतर या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याचे नाव “चेस इन स्कूल “परीक्षेत देशभर उंचाविले आहे.
यानंतर विदर्भातील विविध बुध्दीबळ खेळांडूना मार्गदर्शन करणार असल्याचे प्रियंका चव्हाणने सांगितले.आपल्या यशाचे श्रेय ति प्रसिध्द बुध्दीबळ मार्गदर्शक तथा पती सुरेश चव्हाण यांना देतात.