Home उत्तर महाराष्ट्र आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपाला बोलण्याचा अधिकारच नाही – अनिल गोटे

आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपाला बोलण्याचा अधिकारच नाही – अनिल गोटे

241
0

जितेंद्र हिंगास पुरे – लोक संग्राम

यवतमाळ – मंडल आयोगाच्या विरोधाची तीव्रता वाढविण्याकरिता तत्कालीन भाजपा नेतृत्वाने विद्यार्थी परिषदेने व प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिथावणी दिलेल्या आंदोलनात भावनेच्या आहारी जावून अनेक तरुणांनी सार्वजनिकरित्या आत्मदहन केले होते . कै.गोपीनाथजी मुंडे यांच्या व्यतिरिक्त राज्ययातील यच्छयावत भाजपा नेते मंडल आयोगाच्या शिफारसी विरुध्द होते . अगदी कै . प्रमोद महाजन सुध्दा जाती धर्मावर आधारलेल्याक कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला विरोध नव्हेतर हे आरक्षणच रद्द करा अशीच भुमिका भाजपाची मातृसंस्था , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे . भाजपाच्या नेत्यांनी आरक्षणावर तोंड उघडण्यापूर्वी सरसंघचालक श्री . मोहन भागवत यांच्याकडून जात व धर्माच्या आधारावरील आरक्षणच धोरण संघाने बदलले आहे . एवढे जाहिर करुन घ्यावे , मगच आरक्षणावर आपली मते व्यक्त करावीत . अन्यथा , ‘ वरुन किर्तन आतून तमाशा ‘ अशी हास्यास्पद अवस्था पाजपाची झाली आहे . मराठ्याना आरक्षण हवे मग काँग्रेस / राष्ट्रवादीच्या सरकारने मराठयांना १६ % व मुसलमानांना ५ % आरक्षण जाहिर केल्यानंतर भाजपाने पाठिंबा का दिला नाही ? नारायण राणे समितीच्या शिफारसींना तत्कालीन केलेला विरोध व त्यावेळच्या भाजप नेत्यांच्या वल्गना ग्रामिण भागातील जनता विसरलेली नाही . भाजपामध्ये अमुलाग्र बदल झाला असून आजचा भाजप हा केवळ उच्चवर्णिय व उच्च वर्गाचा झाला आहे . महाराष्ट्राच्या राजकारणाचा वजा शुन्य , अनुभव , शुन्य नेते जेणू काही आपणच भाजपाचे कर्ते – धर्ते आहोत अशा थाटात वल्गना करित असतात . संघ स्वयंसेवक , जनसंघाचे संघटन मंत्री , कै . उत्तमराव नानासाहेब पाटील बरोबर सलग ३० वर्षे काढलेल्या माझ्या सारख्या व्यक्तीशी गद्दारी करणारे भाजपा नेत्यांनी केवळ मी धनगर आहे म्हणूनच माझ्याशी गद्दारी केली . भाजपाचे नेते खामगांवचे माजी आमदार कोकरे साहेब , अण्णासाहेब डांगे , भाजपमध्ये असलेल्या धनगर समाजाच्या एकाही नेत्याशी भाजपाने गद्दारी करण्याचे सोडले नाही . कै . गोपिनाथ मुंडे व शरद पवारांचे राजकीय शत्रूत्व होते . म्हणून माझेही मतभेद होते . टोकाचा विरोध करु नये . शरद पवार किंवा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रेमाचे व सन्मानाचीच वागणूक दिली , जी मला

फडणवीस यांच्या कालखंडात मिळालेली नव्हती . मुंडे साहेबांचे व माझे अनेकदा कडाक्याचे भांडण झालीत . पण त्यांनी कधी कटूता ठेवली नाही . ३-३ , ४-४ महिने आम्ही बोलत नसू , पण अचानक कधीतरी साहेबांचा फोन यायचा पुनच्छ पुर्ववत काहीच न घडल्यासारखे संबंध पूर्ववत होत असत . इतरांना आश्चर्य वाटे पण मनाचा मोठेपणा व दिलदार वृत्ती जन्मजात रक्तातच असावी लागते . ती नाटक करुन येत नाही . भाजपामध्ये नव प्रवेशितांना कळेल तेव्हा त्यांना सर्वप्रथम माझीच आठवण येईल . मा . शरद पवारांवर आपली टिका करण्याची पात्रता आहे की नाही , आपला अनुभव किती , राजकारणातील आपले योगदान काय ? याचा विचार न करता काही लोकं टिका करतात . पण याला ‘ शिढी लावुन उंटाच्या गांडीचा मुका घेणे ‘ असे म्हणतात . अर्थात , हे उंटावरच अवलंबून आहे की , मुका घेवू घ्यायचा की नाही . गावातील एखाद्या ‘ बाई माणसाला ‘ अपत्य झाले तर आमच्याकडे म्हणतात , करुन दिले गांव व कांदेकरांचे नाव अशी काहीशी अवस्था गोपिचंद पडळकरांची झाली आहे .

आणि जातीच्या नावावर भडकवा – भडकवी करणे याची सुधारीत आवृत्ती म्हणजे आरक्षणाच्या मुद्यावर भाजपाने घेतलेली भूमिका आहे . प्रखर हिंदूत्वाच्या गप्पा मारुन काश्मिरमध्ये मेहबूबा मुक्तीच्या गळ्यात मिठ्या मारायच्या या मागील भाजपाची सत्ता लोलुपता निश्चितच दिसून येते . राज्यात १०५ आमदार निवडूण येऊनही सरकार स्थापनेच्या जवळसुध्दा जाता आले नाही . ज्याचे ५६ निवडून आले . त्याचा मुख्यमंत्री , ज्याचे ५४ निवडून आले त्याचे उपमुख्यमंत्री , ज्याचे ४४ निवडणूक आले त्याचे मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष , बरे १०५ चे १०६ झाले , तरी बदल नाही याचे एकमेव कारण अहंकार , आपल्याच लोकांचे काटे काढणे , वर्षा नाईट क्लबमध्ये कारस्थानी करणे , मुह में राम , में छुरी असे दुपट्टी धोरण आणि वारेमाप आश्वासनाची वाचाळता व ज्याच्या मागे ५-१० आमदार नाहीत अशा खुषमस्कऱ्याच्या कळपात स्वप्न रंजन यातूनच सत्ता स्थापनेच्या जवळ सुध्दा जाता आले नाही . अर्थात , सलग अर्धशकत ज्यांच्या बरोबर व्यथीत केलं , सत्तेसाठी तंची अशी तडफड पाहिल्यानंतर माझ्या सारख्या कठोर मनाच्या माणसालासुध्दा दुःख होते . मी या आधीही सांगत होता , आताही सांगतो व भविष्यातपण सांगेन की , शरद पवार हे रसायन तुमच्या अकलेच्या पलिकडचे आहे . हे सरकार फक्त शरद पवारच पाडू शकतात . तुमच्या अवकातील हि गोष्ट नाही . याला आमच्याकडे खानदेशात ‘ दाखडनं काही व घालण काही ‘ असं म्हणतात . भाजपा घेत असलेल्या दुटप्पी भूमिकेमागील सत्ताकारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लहान लहान कार्यकर्त समजून चुकले आहे . मुगेरीलाल के हसीन सपने पहायचे बंद करा ! शरद पवार हे सपनो के सौदागर आहेत व तुमच्या स्वप्नांचा सौदा आधीच करुन ठेवला आहे . असे पत्रक आज राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष यांनी प्रसिध्दीस दिले आहे .

Previous articleखरेदी विक्री साठीची कोरोना चाचणीची अट रद्द करा – मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
Next articleपाथरी तहसील कार्यालयात माहिती अधिकार कार्यकर्त्याला अपमानजनक वागणूक
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.