Home विदर्भ खरेदी विक्री साठीची कोरोना चाचणीची अट रद्द करा – मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

खरेदी विक्री साठीची कोरोना चाचणीची अट रद्द करा – मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

618
0

यवतमाळ जिल्हा खरेदी-विक्री विभागात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यात प्रामुख्याने येणाऱ्‍या प्रत्येक व्यक्तीला कोविड चाचणी सक्तीची केली असून अनेक नागरीकांना यामुळे आर्थिक तसेच मानसिक भुर्दंड सहन करावे लागत आहे. कारण अनेक लोकांना खरेदीची तारिख दिल्यानंतर त्यांनी भरलेला महसूल हा व्यर्थ जात असून त्यांना नाहक त्रास होत आहे. खरेदी-विक्री करत असतांना लागणाऱ्‍या साक्षीदारांची मोठी अडचण होत असून त्या अभावी खरेदी रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय त्या व्यक्तीसमोर राहत नाही. तसेच सद्या जिल्ह्यात पेरणीचे काम सुरु असून अनेक शेतकऱ्‍यांना पिककर्जासाठी गहाणखत करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातून येणारा शेतकरी हा या नियमांमुळे तातकळत बसतो. जिल्ह्यात कोरोनामुळे नागरिक तसेच शेतकरी, व्यापारी हवालदिल झाले असून अशा परिस्थितीत संबंधीत विभागाने काढलेल्या आदेशामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्‍या नागरिकांची ताप तपासणी तसेच लसीकरण संदर्भात पुरावा हा ग्राह्य धरावा जेणेकरुन जिल्ह्यातील येणाऱ्‍या नागरीकांना होणारा मनस्ताप सहन करावा लागणार नाही. अश्या स्वरूपाचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आज दिले.

संबंधित विभागात विवाह नोंदणीसाठी येणाऱ्‍या वर-वधु व साक्षीदारांनाही हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी कोरोना आरटिपीसीआर चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत अनेक विवाह रद्द झाल्याचे प्रकारही जिल्ह्यात घडले आहे. संबंधित विभागाने ऑनलाईन टोकन पध्दत सुरु केली असून यामुळे दिवसभऱ्‍यात २८ नोंदणी होत असून अनेकदा संबंधित विभागाची वेबसाईटचे सर्वर डाऊन असल्यामुळे अनेक नागरिकांना, शेतकऱ्‍यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यवतमाळ जिल्ह्याचा बहुतांश भाग हा ग्रामीण वस्त्यामध्ये असून त्यांना याबाबत पुरेपुर कल्पना नसल्यामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा महिती मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी दिली. संबंधित विभागातील जाचक अट रद्द करुन नागरिकांच्या अनेक प्रलंबीत व्यवहार अडचणी लक्षात घेता ताप तपासणी व कोविड लसीकरण ग्राह्य धरुन नागरीकांना दिलासा द्यावा.अश्या स्वरूपाच्या मागणी चे निवेदन मनसेने आज जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले. या प्रसंगी प्रामुख्याने मनसेचे देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleघरच्यांनी तरुण मुलीस मारून टाकले ????
Next articleआरक्षणाच्या प्रश्नावर भाजपाला बोलण्याचा अधिकारच नाही – अनिल गोटे
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.