Home वाशिम घरच्यांनी तरुण मुलीस मारून टाकले ????

घरच्यांनी तरुण मुलीस मारून टाकले ????

832
0

 

 

मंगरुळपीर येथील प्रकरण

वाशिम(फुलचंद भगत):-मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील ‘त्या’ कुमारीकेची घरच्यांनीच हत्या केल्याचा खबळजनक आरोप खुद्द मृतक मुलीच्या नातेवाईकांनीच केल्याने एकच खळबळ ऊडाली असुन यासंदर्भात पोलिसांमध्ये फिर्यादही दिली आहे.या आरोपाच्या दृष्टीकोनातुन पोलिस पुढील तपास करीत असल्याचे समजले.
आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथे एका १७ वर्षिय कुमारीकेचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.परंतु हा मृत्यु नसुन त्या मुलीच्या घरच्यांनीच तिची हत्या केल्याचा आरोप खुद्द मृतक मुलीच्या नातेवाईकांनीच केला असुन तशी फिर्यादही मंगरूळपीर पोलीस स्टेशनला दिली आहे.सदर मृतक मुलीची शेंदुजरजना येथील एका मुलाशी ओळख होवून त्या मुलाकडुन तिला लग्नाचीही मागणी घालन्यात आली होती.परंतु ही बाब तिच्या घरच्यांना पसंत नव्हती.यावरुन तिला मारहाण करीत होते.समाजात बदनामी होवू नये म्हणून त्या मुलीचा गळा दाबुन हत्या केल्याचा आरोप लेखी तक्रारीमधुन करन्यात आला असुन इतर काही नातेवाईकांचेही या प्रकरणाला संगनमत होते असेही तक्रारीत नमूद आहे.पुरावा नष्ट करन्यासाठी त्या मुलीच्या मृतदेहावर अवघ्या दिडदोन तासातच अंत्यसंस्कारही ऊरकवून टाकला आणी कोणत्याही नातेवाईकांना मृत्युबाबत कळवले नाही.ती मुलगी अविवाहीत असतांना समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे जाळल्या जात नाही परंतु पुरावा नष्ट करन्यासाठी तिला जाळून टाकल्याचा आरोप नातेवाईंकाकडुन करन्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी आणी पथकाने याप्रकरणी सखोल चौकशी करून सत्य ऊजेडात आणावे अशी मागणीही करन्यात आली आहे.

 

Previous articleकिनवट पंचायत समिती कार्यालयात उभारली शिवशक राजदंड स्वराज्यगुढी
Next articleखरेदी विक्री साठीची कोरोना चाचणीची अट रद्द करा – मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.