Home मराठवाडा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा पुढाकार डॉ.राहुल पवार यांच्या उपचारावरील सर्व...

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा पुढाकार डॉ.राहुल पवार यांच्या उपचारावरील सर्व खर्च उचलण्याची एमजीएम रुग्णालयाची तयारी

272
0

औरंगाबाद:-(बालाजी सिलमवार) – कोविड उपचारादरम्यान म्यूकरमायकोसिस या आजाराचा संसर्ग झालेले आणि सध्या औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेले डॉक्टर राहुल पवार यांच्यावरील उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयाने घेतली आहे.

लातूर येथे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करणारे डॉ. राहुल विश्वनाथ पवार यांना कोविड आणि यानंतर म्यूकरमायकोसिस झाल्याने त्यांच्यावर सध्या औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉ. पवार यांचे आई-वडिल ऊसतोड कामगार असून घरची परिस्थिती हलाखीची असून त्याच्या परिवारातील व त्याच्या तांड्या मधील परिसरात वैधकिय शिक्षण घेणारा एकमेव हा विद्यार्थी असून डॉ राहुल यांच्या उपचाराकरिता घरच्यांनी कर्ज काढून तर त्याच्या मित्र परिवाराने वर्गणी गोळा त्याच्या आजवरचा खर्च भगविला परंतु वैधकीय खर्च न परवडणारे असून या डॉक्टरचा जीव वाचवा तो हजारो लोकाचे जीव वाचवेल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मदतीच्या आवाहनाला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी प्रतिसाद देऊन डॉ. पवार यांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले होते. यानुसार एमजीएम रुग्णालयाने डॉ. पवार यांच्यावरील उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे.डॉ. राहुल पवार यांच्यावरील म्यूकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक असणारे Liposomal Amphotericin B हे औषध औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने हे एमजीएम रुग्णालयाचे डॉ. पी.एम. जाधव यांच्या संपर्कात असून डॉ. राहुल पवार यांच्या वरील उपचारात कोणतीही कमतरता राहू नये याची दक्षता घेत आहेत.