Home नांदेड लाचखोर सहायक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात.

लाचखोर सहायक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात.

130
0

मजहर शेख, नांदेड

पंधराशे रुपयेची लाच घेताना रंगेहात पकडले.

नांदेड,दि : १८:- यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांची चुलत पुतणी हिने तिचे पती विरुध्द पोलिस स्टेशन उमरी येथे दिलेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी पेट्रोल खर्च म्हणुन संभा बळीराम कदम, वय 55 वर्ष व्यवसाय नोकरी सहायक पोलिस उप निरीक्षक (ASI) पोलिस स्टेशन उमरी जि. नांदेड रा. सांगवी यांनी दि,१८,५,२०२१ आज रोजी 1500/- रु. लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारली यावेळी.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या सापळा कार्यवाहीत कल्पना बारवकर,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र नांदेड , अर्चना पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक शेषराव नितनवरे ,पोलीस निरीक्षक
ACB नांदेड, टीम पोना हणमंत बोरकर, किशन चिंतोरे, अमरजितसिँह चौधरी, मारोती सोनटक्के, शेख मुजीब यांनी परिश्रम घेतले.