Home विदर्भ यवतमाळ जिल्हात 24 तासात 727 जण पॉझेटिव्हसह 824 कोरोनामुक्त तर जिल्ह्याबाहेरील...

यवतमाळ जिल्हात 24 तासात 727 जण पॉझेटिव्हसह 824 कोरोनामुक्त तर जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह (चंद्रपूर) 15 मृत्यु     

260

यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात गत 24 तासात 727 जण पॉझेटिव्ह तर 824 जण कोरोनामुक्त झाले असून 15 जणांचा मृत्यु झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नऊ मृत्यु, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एक तर खाजगी रुग्णालयातील पाच मृत्यु आहे. तसेच 15 मृत्युमध्ये एक मृत्यु चंद्रपूर येथील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 7578 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 727 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6851 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4336 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2071 तर गृह विलगीकरणात 2265 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 68948 झाली आहे. 24 तासात 824 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 62962 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1650 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.66 , मृत्युदर 2.49 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 84, 65 वर्षीय पुरुष तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 50 वर्षीय महिला, तालुक्यातील 57, 90 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 62 वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील 54 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये पुसद येथील 67 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 34, 78 वर्षीय पुरुष, पुसद येथील 63 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 65 वर्षीय महिला आणि  चंद्रपूर येथील 42 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

            मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 727 जणांमध्ये 458 पुरुष आणि 269 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 155 रुग्ण पॉझेटिव्ह, वणी 84, दिग्रस 83, दारव्हा 81, पुसद 70, झरीजामणी 54, पांढरकवडा 31, बाभुळगाव 29, राळेगाव 25, नेर 24, मारेगाव 23, महागाव 21, घाटंजी 20, उमरखेड 19, कळंब 11, आर्णि 6  आणि इतर शहरातील 11 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 544816 नमुने पाठविले असून यापैकी 542977 प्राप्त तर 1839 अप्राप्त आहेत. तसेच 474029 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

           

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1213 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 32 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2244 आहे. यापैकी 1031 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1213 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 327 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 250 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 145 रुग्णांसाठी उपयोगात, 381 बेड शिल्लक आणि 32 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1141 बेडपैकी 559 उपयोगात तर 582 बेड शिल्लक आहेत