Home महाराष्ट्र लहान चिमुकल्यास सोडून प्रियकरा सोबत पळून गेलेली निर्दयी माता पोलिसांच्या ताब्यात ,

लहान चिमुकल्यास सोडून प्रियकरा सोबत पळून गेलेली निर्दयी माता पोलिसांच्या ताब्यात ,

946

 

हृददायक घटना ,

पोलिसांची कामगिरी

अमीन शाह ,

केज तालुक्यातील एका गावामधील एक १९ वर्षाची विवाहित असलेली महीला दुसऱ्याच्या प्रेमात पडली. आपल्या लहान चिमुकल्याला पतीजवळ टाकून एका युवकासोबत पळून गेल्याची घटना घडली होती. बाहेर जिल्ह्यात जाऊन त्या प्रियकरासोबत तीने संसार थाटण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत या सैराट जोडप्याचा शोध लावला आहे. या जोडप्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्या चिमुकल्याची व निर्दयी मातेची भेट घडवून आणली आहे
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील  १९ वर्षीय विवाहित महीला ही एक मे रोजी आपल्या एक वर्षाच्या बाळाला तिच्या पतीजवळ सोडून गायब झाली होती. याबाबत तीच्या पतीने केज पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली होती. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि संतोष मिसळे यांनी या गायब झालेल्या महीलेचा शोध घेतला असता ती सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ येथे एका युवका सोबत रहात असल्याची माहिती मिळाली.
केज पोलीस ठाण्याचे  कर्मचारी दिनकर पुरी यांनी मल्हारपेठ येथून या विवाहीत महीलेसह एका युवकाला १६ मे रविवार रोजी ताब्यात घेऊन केज पोलीस ठाण्यात हाजर करुन या लहान बाळाची व या निर्दयी मातेची भेट घडवून आणली आहे. प्रियकरासाठी चिमुकल्या बाळाला टाकून गेलेल्या या निर्दयी मातेला व बाळाला पोलिसांनी भेटवल्यानंतर बाळ मात्र आनंदी आहे.