Home विदर्भ यवतमाळ जिल्हात 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जास्त , 5767 जणांचे रिपोर्ट...

यवतमाळ जिल्हात 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जास्त , 5767 जणांचे रिपोर्ट निगेटिव्हसह 919 जण पॉझेटिव्ह, 983 कोरोनामुक्त तर मृत्यु 16

432

 

      यवतमाळ, दि. 6 : बुधवारी जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पार गेल्यानंतर आज (दि.6) सुध्दा कोरोनाबाधितांपेक्षा जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गत 24 तासात 919 जण पॉझेटिव्ह तर 983 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकूण 16 मृत्युची नोंद झाली.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 6686 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 919 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5767 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तसेच गत 24 तासात जिल्ह्यात 983 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.   

सद्यस्थितीत जिल्ह्यात 6937 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2804 तर गृह विलगीकरणात 4133 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 59634 झाली आहे. 24 तासात 983 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 51282 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1415 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.10 , मृत्युदर 2.37 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 68, 79 वर्षीय पुरुष,  तालुक्यातील 48, 65 वर्षीय पुरुष, वणी येथील 65 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 75 वर्षीय महिला, आर्णि येथील 60 वर्षीय महिला, महागाव येथील 70 वर्षीय महिला, मारेगाव तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये पांढरकवडा येथील 85 वर्षीय महिला आणि वणी येथील 65 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 85 वर्षीय पुरुष, वणी येथील 31 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

            गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 919 जणांमध्ये 557 पुरुष आणि 362 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 185 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 134, दारव्हा 101, उमरखेड 84, पांढरकवडा 60, घाटंजी 55, दिग्रस 53, नेर 41, पुसद 33, आर्णि 30, महागाव 30, बाभुळगाव 26,  झरीजामणी 26, राळेगाव 22, मारेगाव 18, कळंब 16 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 455321 नमुने पाठविले असून यापैकी 452328 प्राप्त तर 2993 अप्राप्त आहेत. तसेच 392694 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 515 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 62 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील सहा डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 360 बेडपैकी 181 रुग्णांसाठी उपयोगात, 179 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 36 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2873 बेडपैकी 1480 उपयोगात, 1393 शिल्लक आणि 29 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 720 उपयोगात तर 324 बेड शिल्लक आहेत.