
यवतमाळ – केळापुर तालुक्यातील ग्रामिण भागात व शहरात मायक्रो फायन्स कडुन जबरीने मायक्रो फायनस सभासदा कडुन वसुली केली जात आहे, केळापुर तालुका आदिवासी बहुल भाग आहे, या तालुक्यात मोलमजुरी, शेतीचेरोजंदारी काम करनारे लोक आहेत, ग्रामिण, शहरी भागातील हजारो लोकानी मायक्रो फायन्स चे सभासद होऊन कर्ज घेतलेले आहे, दर आठवडयाला मायक्रो फायन्स (गटाचा) ५००ते१०००रुपयेचा भरणा करावा लागतो या मायक्रो फायन्स (गट)मध्ये सभासद म्हनुन महिलाच असते महिला सभासदानांच कर्ज दिले जाते मायक्रो फायन्स(गट)या नावानी ओळखले जाते मायक्रो फायन्स कडुन वसुली करण्याकरीता एक कर्मचारी येतो एका आठवडयात व सर्वे गटातील महीलाना एकत्र करून मीटिंग घेऊन कोरोना व शोशल डिशटन चे नीयम न पाडता पैसे रुपये भरण्यास सांगतात जेवा पर्यंत पैसे भरतनाहि तेवा पर्यंत फायनस कर्मचारी बसुन असतात नाही, भरलयास नंतर मी पुन्हा येईल म्हणुन वेळ देऊन जाते वेळचा कालावधी संपला तर फोन करुन मानसिक त्रास दिला जातो या एके काळी कोरोणाने थैमान घातला आहे ,मायक्रो फायनस कडून कोरोना नीयम पाडले जात नसलयाने कोरोना वाडत आहे मायक्रो फायनस कर्मचारी याचेवर कोरोना नीयमचे गुन्हे दाखल करणयाची मांगनी जनतेकडून होत आहे कोरोना मुळे शासनाला लाँकडाऊन करावा लागला आहे, ज्यांनी मायक्रो फायन्स (गटाकडुन) कर्ज घेतले आहे, लाँकडाऊन मुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे लॉकडाऊन मुळे कामधंदे नसल्याने कर्ज कुटुन फेड करायची हे एक मोठा प्रशनच पडला आहे,मायक्रो फायन्स गटामुळे नवरा बायकोचे घरात भांडन सुध्दा होत असल्याची चर्चा होत आहे, या मायक्रो फायन्स गटा कर्जा पायी महिला वर्ग हैराण झाले आहे, मायक्रो फायन्स महिलाचां १०ते२०महिलांचा गट तैयार करुन कर्ज दिले जाते पांढरकवडा शहरामध्ये या मायक्रो फायन्स चे कार्यालय ग्रामिण कोठा, उत्सकर्ष,आशीर्वाद,प्युजन,फिनकेयर,मुत्तुत,एस के एस,पंदना, उमेद,इसाफ,असे नावाने आहे, साथरोगामुळे अनेक जण बेरोजगार झाले असुन उसनवारी वर आपला उदरनिर्वाह करीत आहेत,अशा परिस्थितीत मायक्रो फायन्स कडुन होत असलेली सक्तीची वसुली तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी सभासद कडुन होत आहे, गेल्या काही वर्षा पासुन शहरी तसेच ग्रामिण भागातील मायक्रो फायन्सच्या माध्यमातुन गोरगरीब सामान्य लोकांना करारावर पैसे वाटप करण्यात आले, रोजंदारी तसेच छोटे मोठे व्यवसाय करनारे अनेक लोक या मायक्रो फायन्सचे सभासद झाले आहे, कर्ज घेतले, आठवडयाला घेतलेल्याले कर्जाचा टप्याटप्याने भरणा करण्यात येत होता, मात्र गतवर्षीपासुन कोरोना साथरोगा पासुन अनेक उद्योगधंदे व्यवसाय रोजमजुरी बंद झाले दररोज मजुरी करणाऱ्यांचे हि हाल होत आहेत.अशा परिस्थितीत मायक्रो फायन्सकडुन मात्र आपली वसुली चालुच टेवली आहे, स्थानिक अधिकारी तथा वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष घालुन लाँकडाऊनच्या काळात वसुली बंद करण्याची मांगणी होत आहे.










































