Home मराठवाडा पत्रकाराने जिंकली कोरोना विरूद्धची दहा दिवसांची लढाई…!

पत्रकाराने जिंकली कोरोना विरूद्धची दहा दिवसांची लढाई…!

338

वृत संकलन करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून रण मैदानात उतरलेल्या शहरी,ग्रामीण पत्रकारांना विविध संकटांना सामोरे जावे लागते, त्यातच कोरोना महामारिच्या पार्श्वभुमीवर रस्त्यावर उतरलेल्या १०५ पत्रकारांना राज्यात कोरोना बाधीत होवून जीव गमवावा लागलेला आहे.नशिब बलवत्तर म्हणून कोरोना विरूद्ध लढाई जिंकून पत्रकार लक्ष्मण बिलोरे यांना सफलता मिळाली आहे त्यांच्या चाहत्यांनी, हितचिंतकांनी ,आप्तेष्टांनी अभिनंदन केले आहे.

जालना-विशेष प्रतिनिधी

शनिवारी १७ एप्रिल रोजी जालना जिल्ह्याच्या कुंभार पिंपळगाव ता. घनसावंगी येथील दैनिक ‘ महाभारत ‘ चे पत्रकार लक्ष्मण बिलोरे यांना ताप आल्याने अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात RTPCR कोविड- १९ टेस्ट घेण्यात आली.सोमवारी १९ एप्रिल रोजी त्यांचा पाॅझिटीव्ह रिपोर्ट आला.एक दिवसाच्या होमकोरंटाइन नंतर तबियत बिघडली. घनसावंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नागेश सावरगावकर ,प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दिपाली चव्हाण, डॉ.ढवळे ,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दीगंबर गुजर सर यांच्या सल्ल्याने प्राथमिक उपचारानंतर घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृहात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्न केले.वैद्यकिय अधिकारी डॉ.चव्हाण यांनी रेफरल लेटर दिल्यानंतर अल्पसंख्याक मध्ये सात दिवसांसाठी अलगीकरण करण्यात आले. डॉ.घुगे, डॉ.पवन दाड यांनी योग्य ती काळजी घेवून वेऴवेळी नियमित तपासणी करून तापमान, आॅक्सिजन लेवल तपासणी केली.सात दिवस खुप वेदनेत गेले.चक्कर येणे,ताप येणे,मळमळ होणे दम लागणे, छातीमध्ये दडपण येणे असा त्रास झाला परंतू धीट मनाने संघर्ष करत कोरोना वर मात केली यामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी,कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापक यांचें मोठे योगदान आहे दहा दिवसांच्या कोरोना विरूद्धच्या संघर्षातून पुनर्जन्म मिळाला आहे,अशी प्रतिक्रिया व्यक्त करत पत्रकार बिलोरे यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.