Home बुलडाणा देऊळगाव मही येथे कोव्हिड रूगनालय सुरू करण्याची युवासेना व प्रहार यांची मागणी

देऊळगाव मही येथे कोव्हिड रूगनालय सुरू करण्याची युवासेना व प्रहार यांची मागणी

372

३० खाटाचे सर्वात मोठे रुग्णालय फक्त नावाला कोव्हिडं सेंटर नाही गावाला ? काय फायदा

प्रतिनिधी:【रवि जाधव】

देऊळगाव राजा :देऊळगाव मही ही पस्तीस-चाळीस खेड्यांची बाजारपेठ असून रुग्णांना प्राथमिक उपचार घेण्यासाठी सर्वप्रथम देऊळगाव मही मध्ये यावे लागते त्यानंतर देऊळगाव राजा बुलढाणा जालना या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावं लागतं परंतु आजची कोरोना ची परिस्थिती पाहता देऊळगाव राजा जालना आणि बुलढाणा यासारख्या शहरांमध्ये कोरोना बाधित जास्त प्रमानात असल्यामुळे बेड मिळत नाही त्यातून परिसरातील कोरोना बाधितांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे काही ना होम काँरन टाईन राहण्याचे सांगितले जाते परंतु प्रत्येक पेशंटच्या घरी विलगीकरणा साठी मुबलक जागा नसल्यामुळे पर्यायी तो पेशंट त्याच कुटुंबात राहतो आणि कुटुंबाबरोबर आजूबाजूच्या लोकांनाही बाधित करताना दिसत आहे परिसरातील खैरव सरंबा नागनगाव या गावांमध्ये बहुसंख्य कोरोना बाधित आढळले आहेत आणि भौगोलिक दृष्ट्या देऊळगाव मही हे गाव परीसरात उपचाराच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर आहे आपल्या देऊळगाव मही ग्रामपंचायत च्या अंतर्गत सहकार विद्या मंदिर चा इमारतीचा वापर करुन त्या ठिकाणी कोविड रुग्णालय सुरू करून कोरोना रुग्णांवर उपच्यार करणे सोयीस्कर होईल , गावा जवळ असल्यामुळे रुगनाना एकट पडल्यासारखे वाटनार नाही आणी त्यातुन पेशंटचे मनोबल वाढेल ,असे निवेदन वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आले निवेदनामध्ये नमूद केले आहे सर्वतोपरी आपण कोविड रुग्णालयासाठी प्रयत्न कराल न केल्यास लोकशाही मार्गाने जंतुनाशके वापरून सामाजिक अंतर ठेवून मास्क लावून आंदोलन करू असा इशारा, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंगणे, व प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भाऊ शिंगणे आणि गावकऱ्यांनी दिला त्यावेळी मोहम्मद कलीम मोहम्मद हसम, ,उद्धव बनसोडे ,गणेश बनसोडे ,आकाश गवते, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते