Home विदर्भ इंझाळा शेतशिवारात मादी बिबट वाघाचा मृत्यू

इंझाळा शेतशिवारात मादी बिबट वाघाचा मृत्यू

504

यवतमाळ / घाटंजी – दि. २३ एप्रिल रोजी घाटंजी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या साखरा वर्तुळामध्ये सामाजिक वनिकरण विभागाच्या जंगलाच्या बाजूला इंझाळा बिटमध्ये शेतशिवारात दोन वर्षाच्या बिबट जातीचा मादी वाघ शेतकऱ्यांच्या नजरेस पडला असता इंझाळा येथील काही नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हि माहिती दिली. तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी रणजीतसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा बिबट जातीचा वाघ असल्याचे निदर्शनास आले. मात्र वनविभागाच्या वरिष्ठांनी वाघाला पकडण्यासाठी आर आर यू टिम पांढरकवडा व पुसद यांना पाचारण करण्यात आले. तेव्हा वाघ शेतात असल्याची माहिती गावशिवारात पसरल्यामुळे घटनास्थळी वाघ बघण्यासाठी तोबा गर्दी केली. तेव्हा वाघ हिंस्त्रक प्राणी असल्याने घटनास्थळी नागरिकाच्या गर्दीत एखाद्या च्या अंगावर बितू नये यासाठी वनकर्मचारी यांनी नागरिकांना घटनास्थळावरून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले असता नागरिक ऐकत नसल्याने वनविभागाने पोलीसांना पाचारण केले.
ज्या शेतात बिबट वाघ होता त्या शेतात उपडलेल्या पर्हाटीचे मोठमोठे ढिगारे होते त्या ढिगाऱ्याखाली वाघाने आसरा घेतला होता. तेव्हा वनविभागाच्या आर आर यु टिमने त्या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न केला असता वाघाने एका कर्मचाऱ्यांवर झाप मारण्याचा प्रयत्न केला व नंतर परत पर्हाटीच्या ढिगाऱ्याखाली खाली जाऊन घुसला .तेव्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्यासाठी तो ढिगारा काढला असता वाघ मृतावस्थेत दिसला.तेव्हा वाघाच्या पुढच्या दोन्ही पायाला जुन्या मोठमोठ्या जखमा असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा काही दिवसाअगोदर वाघाची व वन्यप्राण्यांच्या शिकारीदरम्यान झटापट झाली असावी यात वाघाच्या पायाला गंभीर जखमी झाला असल्याचा अंदाज वनविभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे. तसेच त्या वाघाला सायंकाळी उशीरा वाघाला वनविभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले व आज दि.२४ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता वाघाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी यांच्या चमुने केले तेव्हा वाघाचा मृत्यू डिहायड्रेशनमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय चमुने वर्तविला आहे.वाघाचे शवविच्छेदन वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वैद्यकीय चमुने शवविच्छेदन केले. यानंतर वनपरिक्षेत्राच्या प्रांगणात त्या मादी बिबट वाघावर जाळून अंत्यसंस्कार करण्यात आले.