Home विदर्भ कोविड-19 ची परिस्थीती आटोक्यात आणायची असेल तर अधिका-यांनी सतर्क राहावे, खासदार रामदास...

कोविड-19 ची परिस्थीती आटोक्यात आणायची असेल तर अधिका-यांनी सतर्क राहावे, खासदार रामदास तडस यांच्या सुचना

160

 देवळी येथे नगर परिषद सभागृहात खासदार रामदासजी तडस यांच्या उपस्तीतीत कोविड-19 संबधीत आढावा बैठक संपन्न

ईकबाल शेख

वर्धा – कोविडमुळे जिह्याची स्थिती दिवसेदिवस गंभीर होत असल्याने संबंधीत नप, महसूल व पोलीस विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात बाहेर ठिकाणावरून आलेल्या लोकांवर कडक नजर ठेवावी तसेच प्रत्येक ठिकाणी लसीकरणवर भर द्यावी अश्या सुचना खासदार रामदास तडस यांनी यावेळी उपस्थित अधिका-यांना आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी तहसीलदार राजेश सरवदे, नगराध्यक्ष सूचिता मडावी, नप मुख्याधिकारी विजय देवळीकर, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक आशिष लांढे, बीडीओ राऊत व नप उपाध्यक्ष प्रो नरेंद्र मदनकर यांची उपस्थिती होती. देवळीच्या कोविड केअर सेंटर येथे ऑक्सीजन बेड सहित डॉक्टर व इतर स्टॉप ची व्यवस्था करावी असे निर्देश खासदार तडस यांनी यावेळी दिले.

तहसीलदार सरवदे यांनी यावेळी बोलताना संबंधित कोविड केअर सेंटर साठी डॉक्टर, परिचारिका व इतर स्टॉप ची कमतरता भासत असल्याचे सांगितले सध्या देवळी तालुक्यातील 800 कोरोना एॅक्टिव्ह लोकांवर 16 निगराणी पथकाचे वतीने लक्ष ठेवले जात आहे लसीकरणासाठी तालुक्यात 16 सेंटर कार्यरत असून आजपर्यंत 23408 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे असे विचार तहसीलदार सरवदे यांनी व्यक्त केले.आढावा बैठकीला नप अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व इतर अधिकारी उपस्थित होते.

कोविडमुळे जिल्हयातील परिस्थीती गंभीर होत चालली आहे. कोविड बाधीत गृहविलगीकरण कक्षात असेल तर बाधीत बाहेर फिरणार नाही या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच बाधीत रुग्ण फिरत असेल तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी, तसेच जास्तीत जास्त बाधीतांना इस्टीटयुट कांरटाईन करावे, कोविड-19 महामारीची परिस्थीती आटोक्यात आणायची असेल तर अधिका-यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले