Home मराठवाडा मुळे आण्णा फाऊंडेशन तर्फे सदर बाजार पोलिस ठाण्याला गेट भेट माजी राज्यमंत्री...

मुळे आण्णा फाऊंडेशन तर्फे सदर बाजार पोलिस ठाण्याला गेट भेट माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर याच्या हस्ते उद्घाटन

266

रमेश आण्णा मुळे यांनी कोरोना महामारिच्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सामाजिक उपक्रम राबविले, तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी त्यांचा सन्मान केला.

जालना- लक्ष्मण बिलोरे

जालना शहरातील सदर बाजार पोलिस स्टेशन येथे रमेश अण्णा मुळे यांनी , मुळे अण्णा फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने फाउंडेशन च्या वतीने सदर बाजार पोलिस स्टेशन येथे पोलीस स्टेशनला मुख्य प्रवेश द्वाराला गेट दिले.
रमेशआण्णा मुळे यांनी आता पर्यंत एका वर्षात कोरोना काळात जालना, औरंगाबाद, बुलढाणा तिन्ही जिल्ह्या मध्ये विविध पोलीस स्टेशनला कोरोना योध्दा म्हणून पोलिसांना सॅनिटायझर मास्क इत्यादीचे वाटप केले .कोरोना योद्धा म्हणून राज्यपाल भगतसिंग कोशारी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी मुळे यांचा सन्मान केला व तिन्ही जिल्ह्यातील गोर गरिबांना त्यांच्या मुळे फाउंडेशन च्या वतीने आज पर्यंत साडेतीन कोटीचे अन्न धान्य वाटप केले. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर मुळे आण्णा फाऊंडेशन चे रमेश अण्णा मुळे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर , पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार, पोलीस नाईक कॉन्स्टेबल समाधान तेलंग्रे ,फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे ,योगेश पठाडे, सक्रु दिन तडवी ,प्रदीप भंडारी, बंटी ओहोळ ,रमेश फुसे आदिची उपस्थित होती.