Home उत्तर महाराष्ट्र देवळा ग्रामीण रुग्णालय…!

देवळा ग्रामीण रुग्णालय…!

612

नाशिक‌ – आज देवळा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे , त्या बदल्यात आरोग्य व्यवस्था खूपच कमकुवत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

देवळा ग्रामीण रुग्णालयात आज आता (ता १७ एप्रिल, १०:३० PM) रात्रीचे एकही रुग्ण दाखल नाही पूर्ण ग्रामीण रुग्णालय रुग्ण विना उभं आहे, अश्या या भव्य शोभेच्या वास्तू मध्ये १० पुरुष वार्डात तर १० महिला वार्डात असे २० ऑक्सिजन बेड पूर्ण पणे रिकामे आहेत, पण मात्र दुसरीकडे तालुक्यातील कोविड रुग्ण ऑक्सिजन करिता जिल्हाभर वणवण करत फीरत आहे, अश्या भीषण परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयातील २० ऑक्सिजन बेड का ❓ कोणासाठी रिकामे आहेत ❓ देव जाणे……..

या गंभीर प्रश्नात प्रशासन व देवळा राजकीय शासन तसेच आरोग्य विभागाने विशेष लक्ष घालून योग्य नियोजनरीत्या ग्रामीण रुग्णालयातील २० ऑक्सिजन बेड कोरोना केयर सेंटर साठी उपयोगात आणले पाहिजे, असे नागरिक व कोरोना रुग्ण नातेवाईक यांच्या कडून बोलले जात आहे.