Home रायगड कर्जतचे पत्रकार जयेश जाधव “कोरोना योध्दाने “सन्मानित

कर्जतचे पत्रकार जयेश जाधव “कोरोना योध्दाने “सन्मानित

252

कर्जत :प्रतिनिधी

कोरोना महामारीत संपूर्ण देशात लॉक डाऊन परिस्थिती निर्माण झाली असताना देखील घरी न राहता जनसामान्यांसाठी आपल्या जिवाची पर्वा न करता पत्रकार जयेश जाधव यांनी अहो दिवसरात्र चांगल्या प्रकारे काम करुन सामाजिक बांधिलकी जोपासत केलेले कार्य उल्लेखनीय, प्रशंसनीय आहे आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन कर्जत नगरपरिषदेतर्फे नुकताच त्यांना कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले.
कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी यांच्या हस्ते पत्रकार जयेश जाधव यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी कर्जत नगरपरिषदेचे कर्मचारी मनिष गायकवाड,दिलिप गायकवाड , सुनील लाड, उद्योजक केतन जोशी, सुरेश बोराडे आदी उपस्थित होते.