Home नांदेड नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी आ. वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादिचे जिल्हाध्यक्ष...

नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी आ. वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादिचे जिल्हाध्यक्ष भोसीकर यांची बिनविरोध निवड

73
0

राजेश एन भांगे

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नावा वर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडुन शिक्का मोर्तब करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. यांच्या विरोधात दुसरा एकही अर्ज आला नसल्यामुळे माजी आ.वसंतराव चव्हाण यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीहर भोसीकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आ. वसंत चव्हाण यांनी गावच्या सरपंच पदापासून जिल्हापरिषद सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, नायगाव मार्केट कमिटी चेअरमन, आणि आता नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष अशी नामी पदे भूषवित आपल्या राजकिय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील विविध पदाचा कार्यभार सांभाळीत आपल्या सातत्यपूर्ण कार्याची झुनुक समाजमनावर बिम्बवत ठेवली आहे.

या निवडीमुळे नायगावकर पुन्हा राजकिय क्षेत्रात जोमाने पुढे आल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
सर्वच क्षेत्रातून त्यांचे या निवडी बद्दल अभिनंदन ही करण्यात येत आहे.