Home नांदेड धक्कादायक” देगलूर येथील अपहरण झालेला मुलगा गंभीर जख्मी अवस्थेत सापडला

धक्कादायक” देगलूर येथील अपहरण झालेला मुलगा गंभीर जख्मी अवस्थेत सापडला

256

राजेश एन भांगे

देगलूर येथील साधना नगर येथील
लहान मुलगा हरवल्याची बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित होताच शहरवासीयांत एकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

हरवलेल्या मुलांच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्या नंतर पोलीसांनी ही शोधमोहीम सुरू केली असतानाच आज सकाळी पावणे चारच्या सुमारास अत्यंत जखमी अवस्थेत इरटिका चारचाकी गाडि जवळ एक पिडित मुलगा (रडत) दिसुन असल्याचे बडुर ता. बिलोली येथील एका ग्रामस्थाने देगलूर पोलिस ठाणे फोन करून कळविले.

त्या नंतर तात्काळ देगलूर पोलिस ठाणे येथुन एक पथक बडुर येथे जावुन पीडित लहान मुलाला या ताब्यात घेत देगलूर उपजिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल केले.
तरी अपहरणकर्ता महेश शेषेराव बोईनवाड याने लहान मुलाचे अपहरण करुन क्रुर निर्दयीपणे अत्यंत गंभीर जख्मी (रक्तबंबाळ) केले असुन.

बडुर ता.बिलोली शिवारात अपहरणकर्ता च्या इरटिका गाडिचे डिझेल संपल्यामुळे गाडि बंद पडताच पिडित मुलाने रडतच शेतातील ग्रामस्थांच्या खोपी कडे धाव घेतल्याने ग्रामस्थांनी मुलाला जवळ घेतल्याचे पाहुन अपहरणकर्ता महेश बोईनवाड याने पळ काढला असुन.

तरी अपहरणकर्ता महेश बोईनवाडवर कलम ३६३ चा गुन्हा दाखल करण्यात आले आहे असे
देगलूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीभगवान धबडगे यांनी माहिती दिली.

तरि या घटने मुळे सर्व सामान्यांन मधुन संताप व्यक्त केला जात असुन अशा निर्दयी अपहरणकर्ता ला कठोर शिक्षा देण्यात यावी असे बोलले जात आहे.