Home मराठवाडा सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता तुकाराम गावंडे यांचा सन्मान

सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता तुकाराम गावंडे यांचा सन्मान

71
0

जगद्गुरु तुकोबाराय प्रतिष्ठानचे राजेंद्र भोसले यांच्या वतीने केला सत्कार

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

अंबड तालुक्यातील कवडगाव येथे सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता तुकाराम गावडे यांनी विविध पदावर काम करताना उत्कृष्ट कार्य करत सेवानिवृत्त झाले याबद्दल ग्रामस्थ व जगद्गुरू तुकोबाराय प्रतिष्ठानचे राजेंद्र भोसले यांच्यावतीने सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना गावडे म्हणाले की,कवडगाव हे माझे जन्मगाव आहे.येथील जिल्हा परिषद शाळेत माझे शिक्षण झाले.घरातील आर्थिक परिस्थिती ही अतिशय बिकट होती.तरी चिकाटी,मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या बिकट परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केले.सन १९८३ साली मी कनिष्ठ अभियंता म्हणून जलसंपदा विभागात रुजू झालो.तर आज उपविभागीय अभियंता म्हणून निवृत्त होत आहे.स्थापत्य अभियंता म्हणून ३८ वर्षे बीड,उस्मानाबाद,औरंगाबाद,
जालना,परभणी इत्यादी ठिकाणी काम केले.तसेच ३ वेळा आदर्श अभियंता हा पुरस्कार देण्यात आला.

तरुणांनी आज व्यसन न करता दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे.मोबाइल व इतर भौतिक सुविधांच्या मागे न धावता जीवनात संघर्ष करून यश मिळाले पाहिजे.तरुणाई ही व्यसनाधीनतेकडे जात आहे.ही गोष्ट अत्यंत घातक आहे.त्यांनी तसे न करता निर्व्यसनी राहीन आई-वडिलांची सेवा केली पाहिजे.जीवनात यश-अपयश येत असते.त्याशिवाय जीवन जगता येणार नाही,असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद मुख्याध्यापक देविदास जाधव,शिक्षक प्रकाश पालवे,पंढरीनाथ जाधव,सरपंच डॉ.रामकीसन जाधव,उपसरपंच हरिभाऊ खवले,भाई जामदरे,डॉ.रामेश्वर राजगुडे,तुळशीदास गाडे,संतोष गलपट्टे,बालाजी गावडे,गजानन तुपे,उद्धव भोंडे,विठ्ठल खवले,भगवान जाधव,सतीश गावडे,माणिकराव भापकर,सतीश राजगुडे,जगन्नाथ जाधव यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियंता तुळशीराम गाढे यांनी केले.