Home मराठवाडा कोरोना लस सुरक्षित आहे,ती घेणे गरजेचे आहे – पत्रकार राज छल्लारे

कोरोना लस सुरक्षित आहे,ती घेणे गरजेचे आहे – पत्रकार राज छल्लारे

327
0

जालना – लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा अशा विविध ठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे.परंतु या लसीकरणाला फार अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.लस सुरक्षित आहे.ती घेणे गरजेचे आहे,असे आवाहन पत्रकार राज छल्लारे यांनी केले आहे.त्यांनी पुढे म्हटले आहे की,
सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला दिसत आहे.अगदी आपल्या घरात व घराजवळ कोरोना पोहचला आहे.परिणामी दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहे.या कोरोनांमुळे गरीब,सर्वसामान्य जनता भयभीत झाल्याने उपचारासाठी लाखो रुपये खर्च कोठून आणायचा,हातावर रोजीरोटी कमावणारा माणूस आज अडचणीत सापडला आहे.हे टाळण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
लसीकरणाबाबतीत खूप गैरसमज पसरवल्या गेले आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.लस घेतल्यावर काहीतरी थोड्या प्रमाणात त्रास होतो.काहींना तर होत पण नाही.हा त्रास डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या की होत पण नाही.त्यामुळे या लसीकरणाबाबत कुठल्याही प्रकारचा गैरसमज मनात न आणता लस घ्यावी.

यासाठी विद्यार्थी मित्र,सामाजिक कार्यकर्ते,अधिकारी,पदाधिकारी तसेच समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेऊन नागरिकांमधील लसीकरणाची भीती दूर करून त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करावे.जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.अन गोरगरीब जनता लाखो रुपयांच्या खर्चापासून वाचेल.
लसीकरणाला जाताना पोटभर जेवण करून जावे.तसेच सोबत आपले ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जावे ,कोरोना लस अत्यंत सुरक्षित असुन ती घेणे गरजेचे आहे,असे आवाहन पत्रकार राज छल्लारे यांनी केले आहे.