Home नांदेड शिवभोजन चे बोगस लाभार्थी ,, श्याम नगर दवाखान्यातील केंद्र चालकाची बनवाबनवी

शिवभोजन चे बोगस लाभार्थी ,, श्याम नगर दवाखान्यातील केंद्र चालकाची बनवाबनवी

158
0

नांदेड –  गोरगरिबांना वरदान ठरलेल्या शिव भोजन थाली चे श्याम नगर दवाखाना येथील केंद्रचालकांनी बोगस लाभार्थी दाखवून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे .

विशेष म्हणजे दिशाभूल करण्यासाठी केंद्र चालकाने एकाच व्यक्तीचे तीन वेळेस फोटो काढून शासनाला चुना लावण्याचा प्रकार चालू आहे याबाबत युवा सेने चे तालुका समन्वयक नकुल जैन यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन सदरील केंद्र चालकाचे करार रद्द करावा जेणेकरून होतकरू लोकांना त्याचा लाभ घेता येईल 48 ते 50 थाल्या वाटप झाल्यानंतर केंद्र चालकाला विचारणा केली असता आमचा आजचा कोटा पूर्ण झालेला आहे असे त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले शासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी अन्यथा युवा सेनेच्या वतीने अमर उपोषण करण्यात येईल.