Home विदर्भ ईचोरा येथील फसवणूक प्रकरणातील जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुणावणी.....

ईचोरा येथील फसवणूक प्रकरणातील जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुणावणी.. !

173
0

अयनुद्दीन सोलंकी

घाटजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ईचोरा (ता. आर्णी) ग्रामपंचायत मध्ये 50 लाख 62 हजार 785 रुपयाचा संगणमत करुन अपहार करण्यात आला असून, आर्णी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या रिपोर्ट वरुन, आर्णी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी जी. आर. इंगोले यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी तत्कालीन सरपंच संदीप राजाराम वंजारी (वय 42), ग्रामपंचायतचे तत्कालीन सचिव विलास गोविंदराव सोनुले (वय 49) विरुद्ध भादंवि 409, 34 अन्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माजी सरपंच संदीप वंजारी यांनी यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरख चौधर यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उप निरीक्षक रविंद्र ताले हे पुढील तपास करीत आहे.
पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर 2017 ते 14 जानेवारी 2020 पर्यंत तत्कालीन सरपंच संदीप वंजारी व सचिव विलास सोनुले हे आर्णी तालुक्यातील ईचोरा ग्रामपंचायत मध्ये कार्यरत होते. दरम्यान, ईचोरा ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या रक्कमेत गैरप्रकार झाल्याचे आर्णी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या लक्षात आले. त्यावरुन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोविंद राजाराम इंगोले यांना ईचोरा ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावरुन 3 मार्च 2021 रोजी पंचायत विस्तार अधिकारी इंगोले ह्यांनी सखोल चौकशी केली असता, त्यात सामान्य निधी, पाणी पुरवठा निधी, दलीत वस्ती सुधार योजना, बळीराजा चेतना अभियान, चौदावा वित्त आयोग तसेच जमा, खर्च तपशिलावरुन प्रमाणके उपलब्ध नसल्यामुळे आणि प्राकलन, मुल्यांकन व ईतर 1 ते 33 नमुने उपलब्ध नसल्यामुळे 50 लाख 62 हजार 785 रुपयाचा संशयीत अपहार केल्याचे प्राथमिक चौकशी अहवालावरुन निष्पन्न झाल्याने तत्कालीन सरपंच संदीप वंजारी व सचिव विलास सोनुले हे दोघेही प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याचे अहवालावरुन दिसुन येत असल्याने, जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडघे यांच्या निर्देशावरुन सदर प्रकरणात अपहार केल्याचा गुन्हा पारवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रविंद्र ताले करीत आहे.