Home विदर्भ सावळी – सदोबा येथील माजी सरपंचासह ईतरांविरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे...

सावळी – सदोबा येथील माजी सरपंचासह ईतरांविरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल..!

358
0

पारवा पोलीसांचा तपास सुरू..?


अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) – घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळी सदोबा (ता. आर्णी) येथील संशयीत आरोपी किशोर केशेट्टीवार यांनी जागृती अँग्रो फुड्स अँन्ड ईन्फ्रा प्रोजेक्ट्स एलएलपी या शेळी पालनाच्या व्यवसायात पैसे गुंतवून फिर्यादी प्रशांत खरात (उपाध्यक्ष, आर्णी तालुका भाजपा) यांची फसवणुक केल्या प्रकरणी किशोर केशेट्टीवार विरुद्ध भादंवि 420, 506 अन्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सदर गुन्हयात आणखी आरोपीचे नांवे समाविष्ट होणार असून या गुन्ह्यात आरोपीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. सदरच्या गुन्हयात भादंवि 417, 34 व ईतर गुन्हे समाविष्ट होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.
विशेष म्हणजे शुक्रवारी पारवा पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी केशेट्टीवार व ईतर आरोपी हजर झालेले असतांना सुध्दा, पारवा पोलीसांनी आरोपींना अटक केलेली नाही, हे येथे उल्लेखनीय.
पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप निरीक्षक देविदास टेंभरे पुढील तपास करीत आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी किशोर केशेट्टीवार याने सन 2014 मध्ये फिर्यादी प्रशांत खरात याची भेट घेऊन जागृती अँग्रो फुड्स अँन्ड इन्फ्रा प्रोजेक्ट्स एलएलपी मध्ये शेतीपालनात व्यवसायात काही रक्कम गुंतवली तर अनेक फायदे होउ शकतात. तसेच रु. 5000 जमा केल्यास 6 वर्षात रु. 50,000, रु. 50,000 भरल्यास रु. 5,00,000 व रु. 1,00,000 भरल्यास रु. 10,00,000 मिळतील, अशा आशयाचे प्रलोभन लाभार्थांना देण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी प्रशांत खरात यांनी आरोपी किशोर केशेट्टीवार यास सन 2014 पासून रुपये 5000 प्रमाणे रुपये 50,000 गुंतवणूक केली. तसेच आरोपीने 27 आँक्टोंबर 2014 ते 27 आँगस्ट 2020 या कालावधीत बाँन्ड पेपर सुद्धा फिर्यादीस आणून दिला. विशेष म्हणजे बाँन्ड पेपरची मुदत संपल्यावर फिर्यादी खरात याने केशेट्टीवार यांना बाँन्ड पेपरची मुदत संपल्याने रक्कमेची मागणी केली. मात्र, आरोपीने रक्कम देण्यास टाळाटाळ करुन कंपनी सोबत पंढरपूर (सांगली) येथे पत्रव्यवहार करण्यास सांगितले. त्यावरुन खरात यांनी कंपनीकडे पत्र व्यवहार केला, मात्र, तेथे कोणतेही कार्यालय उपलब्ध नसल्याने पाठविलेले कागदपत्रे परत आले, असा शेरा पोष्टमनने मारुन परत पाठविले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे खरात यांच्या लक्षात आल्याने त्यांनी 16 जानेवारी रोजी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पारवा पोलीसांनी चौकशीवरुन संशयीत आरोपी किशोर केशेट्टीवार विरुद्ध जिवे मारण्याची धमकी देउन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. तथापि, या प्रकरणात फसवणूक झालेले विजय मारबते, मयुर निळकंठ कानिंदे, युसूफखाँ महेबुबखाँ, मुकींदा सोनबा हांडे, वसीमखाँ शेरगुलखाँ आदींनी शनिवारी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पारवा पोलीसांनी त्या सर्वांचे बयाण नोंदविले आहे. विशेष म्हणजे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एकाच प्रकरणात दोन गुन्हे दाखल करता येत नसल्याने, फिर्यादी प्रशांत खरात यांच्या गुन्हयातच सदरचा गुन्हा समाविष्ट करण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या बयाणात अमर भुपेंद्र शिंदे, दिग्विजय भुपेंद्र शिंदे, किशोर दादाजी केशेट्टीवार सह ईतरांचे नांवे पारवा पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या बयाणात नोंदविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. खरात यांच्याच गुन्हयात भादंवि 417, 34 व ईतर गुन्हे समाविष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक देविदास टेंभरे करित आहे.