Home जळगाव रावेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल तर्फे रक्तदान शिबीर…

रावेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल तर्फे रक्तदान शिबीर…

212
0

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे आज १० एप्रिल रोजी त्रिमूर्ती चौकातील नंदपाल दुध उत्पादक संस्था सभागृहात राष्ट्रवादी ओ.बी.सी सेल रावेर तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, कोरोनासारख्या महामारीने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. या बिकट परिस्थितीत कोणत्याच रूग्णाला रक्ताचा साठा कमी पडू नये, आपले रक्तदान हे कोरोना रूग्णांसाठी ठरेल जीवदान या उद्देशाने रावेर राष्ट्रवादी तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संखेने पुढे येऊन रक्तदान केले, निंभोरा रावेर तालुका ओ.बी.सी.सेलच्या वतीने तालुका अध्यक्ष सुनिल कोंडे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे असतील. तर प्रमुख पाहूणे राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष अँड रविंद्र भैय्या पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे होते,तर या रक्तदान शिबिराचे आयोजनासाठी कार्याध्यक्ष विलास ताठे, दिपक पाटील,प.स.सदस्य रावेर, शहराध्यक्ष मेहमूद शेख , वाय डि पाटील, सरचिटणीस ओबीसी सेलचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल ठाकरे, किरण कोंडे, युगल राणे, गणेश तेली, भुवन बोरोले, चेतन महाले, यांनी परिश्रम घेतले,तसेच गोदावरी रक्तदान पेढी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीपणे रक्तदान शिबिर संपन्न झाले.