Home नागपूर अन्न पाण्या विना वृद्ध आई आणि अपंग मुलाचा दुर्देवी मृत्यू ,

अन्न पाण्या विना वृद्ध आई आणि अपंग मुलाचा दुर्देवी मृत्यू ,

549
0

 

दुर्देवी दुःखद घटना ,

अमीन शाह ,

लॉक डाऊन मुळे घराबाहेर सुद्धा पडता येत नाही तर मग मोलमजुरी करणाऱ्या लोकांनी जगायचं कस दोन वेळेच्या जेवणाची सोय नसल्याने गरीब लोकांना घरातच अन्न पाण्याविना मरावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .सरकार ने लोकडाऊन करण्या पूर्वी गरिबांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे आज आई अन मुलाचा भाकरी विना तडफडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना विदर्भातील वरोरा शहरातील यात्रा वार्ड परिसरात घडली असून इथे राहणाऱ्या पोलिओग्रस्त 50 वर्षीय अंकुश जगदीश खोब्रागडे व 80 वर्षीय आई द्रौपताबाई जगदीश खोब्रागडे ह्या दोघांचा त्यांच्या राहत्या घरी अन्न पाण्याविना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार खोब्रागडे यांचं यात्रा वार्ड परिसरात स्वतःच घर आहे , मोठा मुलगा काही कामानिमित्त मुंबई येथे गेल्याने जगदीश व आई द्रौपताबाई यांच्यासाठी जेवणाची सोय जवळील मेस येथे मोठ्या मुलाने करून दिली होती . अंकुश हा जन्मजात पोलिओ ग्रस्त होता , त्यामुळे जगदीशची आई डबा घ्यायला जात असे मात्र काही दिवसांपासून द्रौपताबाई ह्या दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या , 3 दिवसापासून द्रौपताबाई डबा घेण्यासाठी खानावळीत गेल्या नसल्याने काहींनी त्यांची चौकशी केली असता घरी दुर्गंधी येत आल्याने नागरिकांनी आत प्रवेश केला असता दोघे आई व मुलगा मृत अवस्थेत होते , त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता . पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील चाचणीसाठी मृतदेह वरोरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे , दोघांचा मृत्यू उपासमारीने झाला असल्याची माहिती प्राप्त झाली असून कोरोना आजारा पेक्षा उपासमारी मुळे जास्त लोकांचा जीव जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून लोकडाऊन करण्या पूर्वी शासनाने गरिबांचा विचार करावा ,