Home नागपूर महाराष्ट्र पोलिसांच्या अस्तित्वाची लढाई सन्मानाने जगायची आहे महाराष्ट्रात पोलीस प्रतिनिधी आमदार निवडून...

महाराष्ट्र पोलिसांच्या अस्तित्वाची लढाई सन्मानाने जगायची आहे महाराष्ट्रात पोलीस प्रतिनिधी आमदार निवडून द्यायचा…!

410

नागपूर – महाराष्ट्र पोलीस 24 तास 365 दिवस जनतेची अहोरात्र सेवा करूनही उपेक्षित असणारा प्राणी म्हणजे महाराष्ट्र पोलीस..कारण महाराष्ट्र पोलीस हा अनुशासन आणि शिस्तप्रिय विभाग मध्ये मोडला जातो तसेच यांची कुठलीही संघटना नाही तसेच यांना संघटना करण्याचे अधिकार पण नाहीत ब्रिटिश कालीन कायद्यांवर आताही पोलिसांची वाटचाल सुरू आहे. पोलीस शिपाई पासून मापोसे डीसीपी पर्यंत हे सर्व महाराष्ट्र पोलीस मध्ये येतात आणि त्यानंतर चे जे अधिकारी आहेत ते आयपीएस इंडियन पोलीस सर्विस मधून येणाऱ्या अधिकारी असतात ज्यांची निवड यूपीएससी मार्फत केंद्र सरकार करते तसेच त्यांना पुरवणाऱ्या सर्व सुविधा केंद्र शासनामार्फत पुरवल्या जातात तसेच आईपीएस आयपीएस अधिकारीची संघटना असल्यामुळे त्यांना कुठलाही त्रास कुठेही जात नाही पण महाराष्ट्र पोलीसातील पोलीस शिपाई ते मापोसे डीसीपी पर्यंत हे सर्व महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये येतात आणि त्यांची कुठलीही संघटना नाही. या कारणामुळे प्रत्येक आयपीएस वर्गाकडून कनिष्ठ अधिकाऱ्यांकड़े पाहण्याचा व काम करून घेण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे.. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे कार्य हे ग्राउंड लेव्हलवर पोलीस शिपाई ते मापोसे डीसीपी पर्यंत होत असते बाकी सर्व प्रकारचे अधिकारी हे सुपरव्हिजन करत असतात आणि सर्वांवर लक्ष देत असतात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यामागे यांच्या अधिकाराचा फार मोठा वापर होत असतो. पण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी कोणीही कनिष्ठ अधिकारी किंवा अंमलदार यांच्यासाठी लढताना किंवा त्यांची हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे..आणि यामुळेच मापोसे वर्सेस आयपीएस ही फार मोठी दरी पोलीस खात्यात दिसून येते पण निदर्शनात येत नाही कारण पोलिसांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला कुठेही वाचा फोडण्यासाठी तोंड उघडता येत नाही. कारण पोलीस खात्यामध्ये अनुशासन आणि शिस्त ही फार महत्त्वाची आहे. आणि जर याचे पालन करणे कोणी चुकले तर त्याला शिक्षा ही फार लवकर मिळते तसेच जर कोणी कामगिरी चांगली केली तर एकदा त्यांचे चांगले रिवार्ड उशिरा मानले जातील पण शिक्षाही फार लवकर मानले जाते. त्यामुळे समाजाला खऱ्या अर्थाने संरक्षण देणारा पोलीस हा एक माणूस आहे हे समाज विसरून गेलेला आहे. समाजही पोलिसांप्रती खूप संवेदनशील नाही हे चित्र नेहमीचे आहे . पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करण्यामागे अनेक नालायक भ्रष्ट बेइमान पोलीस अधिकाऱ्यांचा फार मोठा वाटा आहे…पण आजही 95% अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यामुळेच पोलीस खात्याचे नाव समाजामध्ये उंचावलेले पण आहे आणि याच पोलिसांच्या भरोशावर समाजाची सुरक्षा कायदा व सुव्यवस्था मंत्र्यांची सुरक्षा जनतेचे सुरक्षा सर्व जनतेचे जाणू मालाचे रक्षण निवडणूक बंदोबस्त मोरचे आंदोलने हे सर्व पोलिसांच्या संरक्षणामध्ये पार पाडले जातात पोलिसांशिवाय जनतेच्या संरक्षणाची किंवा कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्र पोलिसांवर संकट येते तेव्हा कुठलाही राजकीय नेता लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री पोलिसांच्या मागे उभा राहत नाही ही एक फार मोठी दुःखद घटना आहे याला कारणही तसेच आहे कारण पोलिसांचा कोणीही वाली नाही, पोलिसांचा नेहमी राजकीय वापर मोठ्या प्रमाणात करून घेतला जातो यांना राजकारणाचे बळी केला जाते, अनेक वरिष्ठ अधिकारी आपली खुर्ची व इज्जत वाचवण्यासाठी कनिष्ठांचे बळी घेतल्याचे अनेक प्रकरण महाराष्ट्रात ताजी आहे. कारण त्यांनाही माहित आहे की पोलिसांचे युनियन नसल्यामुळे हे आपलं काहीच वाकड करू शकत नाही तसेच शिस्त प्रिय विभाग असल्यामुळे इथे शिक्षा लवकर होते पण सन्मान फार उशिरा दिला जातो. तसेच इथे काम करणाऱ्या कनिष्ठ अंमलदार व अधिकाऱ्यांची फार मोठी गय केली जात नाही…त्यांना भेडसावणाऱ्या समस्या किंवा उद्भवणारे प्रश्न हे पूर्णपणे मार्गी लागत नाही. दमदाटी करून प्रेशर करून काम करणार आहे डिपार्टमेंट आहे. आज महाराष्ट्रातील किंवा देशातील कोणत्याही नेत्यांना पोलिसांसाठी काम करायला पाहिजे किंवा त्यांचे भले करायला पाहिजे असं कधीही वाटत नाही किंवा त्याचा ते स्वप्नातही विचार करत नाही फक्त इलेक्शन आले निवडणूक आल्या की पोलिसांच्या दोन-चार प्रश्नावर फक्त बोलतात पण करत काहीच नाही ही आजपर्यंतची स्थिती आहे…पोलिसांना शिस्त आणि अनुशासनाच्या नावावर गुलामगिरीची वागणूक देऊन वेठबिगार बनविले आहे आणि शासनकर्ते राजकारणी त्यांना आपल्या दावणीला बांधलेल्या बैलासारखी वागणूक देत आहे कारण त्यांनाही माहित आहे की यहे पोलीस आपलं काहीच वाकडा करू शकत नाही कारण यांची महाराष्ट्रात कुठलीही संघटना नाही युनियन नाही आणि यांच्यासाठी लढणारा कुठलाही लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री नाही. आणि जे पोलीस खात्याचे गृहमंत्री म्हणून काम करतात त्यांनाही पोलीस अंमलदार अधिकाऱ्यांसाठी काम करण्याचा खूप जास्त रस नसतो त्यांना गृह खात्यासाठी काम करून गृह खात्याची मलाई खाण्यात जास्त रस असतो. पोलीस खात्याला विलक्षण दुटप्पीपणाची वागणूक आणि धोरण ते लोक अवलंबत असतात आणि आपल्या ऑर्डरवर नाचवून त्यांच्याकडून वाटेल ते व त्यांना वाटेल तसे कामे ते करून घेतात हे सर्व महाराष्ट्राने अनुभवलेले चित्र आहे. अशा चारी बाजूने सापडलेल्या पोलिसांना संकटकाळी कोण सावरणार कोण त्यांचा वाली होणार हा प्रश्न वर्षानुवर्षे आजही प्रलंबित आहे कारण शिस्ती व अनुशासन च्या नावाखाली पोलीस कुठेही समोर येऊन बोलू शकत नाही आणि परिवार वाढीस लागल्यानंतर आपल्यामुळे परिवारावर कुठली गडांतर येऊ नये म्हणून पोलिसांनी पोलीस परिवाराही समोर येत नाही आणि त्यामुळे यांच्यावर होत असलेला अन्यायाला कोणीही वाचा फोडायला तयार होत नाही हे आजचे सत्य आहे. वेळ काळानुसार पोलीस खात्यात अनेक आधुनिक तंत्र आले भरपूर प्रगती झाली नवीन योजना आल्या पोलिसांचे 50% तरी भले झाले असे त्यांना वाटते पण प्रत्यक्ष काम करणाऱ्या पोलीस अंमलदार व अधिकारी यांना अजूनही आपण गुलामगिरी मध्ये असल्यासारखे भासत आहे कारण इथे त्यांच्या मनासारखे वागणे त्यांना कोणीच करू देत नाही अनुशासन आणि शिस्तीचा विभाग असल्यामुळे ते नेहमी भयमुक्त आणि चिंतामुक्त जीवन जगू शकत नाही. कामाचे व वेळेचे नियोजन नसल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक व मानसिक संकटांचा आरोग्याचा सामना करावा लागतो आपल्या परिवाराला इथे पूर्ण वेळ देऊ शकत नाही कुठलाही धार्मिक कार्यक्रमांमध्ये किंवा सनउत्सवांमध्ये ते राजी खुशीने शामिल होऊ शकत नाही कारण त्यांचा बंदोबस्त असतो.. 24 तास 365 दिवस कितीही मरमर काम केले तरी समाजाला त्यांच्या या परिश्रमाची कुठलीही घेणे देणे नाही तसेच महाराष्ट्र मध्ये ज्या लोकांची सरकार आहे जे राजकारणी आहे त्यांची ही सुरक्षा 24 तास 365 दिवस हे पोलीस डोळ्यामध्ये तेल घालून करत असतात पण कधी त्यांच्या प्रश्नांकडे कोणताही लोकप्रतिनिधी मंत्री आमदार खासदार लक्ष देत नाही ही या महाराष्ट्राची फार मोठे दुर्दैव आहे. आपल्या वरिष्ठांकडे डायरेक्ट हे कोणत्याही गोष्टीसाठी दाद मागू शकत नाही…फारच कमी अपवाद असणारे अधिकारी यांची बाजू ऐकून यांना न्याय प्रदान करतात पण अनेकदा असे होताना दिसत नाही. अशा या महाराष्ट्र पोलिसांचे जर जीवनमान सन्मानाने उंचवायचे असेल तर भविष्यात यांनी स्वतःला सावरणे व स्वतःसाठी आपला प्रतिनिधी तयार करणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्रामध्ये क्रीडा मतदार संघ आहे पदवीधर मतदार संघ आहे शिक्षक मतदार संघ आहे पण पोलीस साठी अजून पर्यंत कुठलाही मतदारसंघ राखीव केला गेला नाही अनेक वर्षांची ही मागणी आहे पण जर पोलिसांचा मतदारसंघ झाला तर पोलीस वाले आपलं ऐकणार नाही आणि त्यांच्यावर आपलं वर्चस्व राहणार नाही अशी भीती सर्व राजकारणांना आहे आणि त्यामुळेच पोलिसांचा मतदारसंघ व्हायला पाहिजे किंवा त्यांची संघटना तरी व्हायला पाहिजे यावर कुठलाही राजकीय पक्ष आजपर्यंत काम करायला तयार नाही. आज खऱ्या अर्थाने पोलिसांना जर त्यांचा लोकप्रतिनिधी वाली त्यांच्यासाठी काम करणारा प्रतिनिधी तयार करून घ्यायचा असेल तर त्यांनी आपल्या पोलीस कुटुंबातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असो, पोलीस पत्नी असो, पोलीस बाईज गर्ल्स असो किंवा त्यांच्यासाठी कुठूनही काम करणारा प्रामाणिक सामाजिक संघटना असो यांच्या प्रतिनिधींना अपक्ष उभे करून निवडून देणे फार गरजेचे व निगडीचे झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पोलिसांची व त्यांच्या परिवारांची संख्या ही 35 ते 40 लाखाच्या आसपास आहे तसेच या पोलीस बांधवांचे नातेवाईक मित्रमंडळी असा जर मोठा विचार केला तर हा आकडा एक करोडच्या घरामध्ये जाईल. पोलीसच दिवस-रात्र सर्व गोष्टीला सुरक्षा देत असल्यामुळे पोलिसांशिवाय या समाजाची कल्पना करू शकत नाही. महाराष्ट्राचा कितीही मोठा नेता असला तरी तो पोलिसांच्या सुरक्षा गरडा शिवाय बाहेरही पडू शकत नाही कोणत्याही नेत्याची हिंमतही बाहेर पडायला होणार नाही जर पोलीस सोबत नसले तर, इतकी सर्व पावर आणि प्रसिद्धी या पोलिसांकडे असूनही या पोलिसांचे कुठेतरी हात बांधले गेले आहेत आणि त्याच्यामुळेच हे राजकारणी यांच्यावर शिरजोड झालेले होताना दिसत आहे. या अशा जुलमी वागण्यावर जर खऱ्या अर्थाने न्याय मिळवायचा असेल तर प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्याने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदारांनी पोलीस परिवाराने पोलीस बॉईज ने गर्ल्स ने पोलीस पत्नीने सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांसाठी लढणे त्यांच्या सन्मानासाठी लढणे आज गरजेचे आहे. आज पोलिसांच्या सन्मानार्थ खऱ्या अर्थाने हक्क व अधिकारासाठी अनेक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन पोलीस बॉईज असोसिएशन पोलीस पत्नी असोसिएशन काही सामाजिक संघटना कार्य करत आहे. पोलिसांच्या बळावर आणि त्यांच्या जीवावरच शासन करते राज्य करू शकतात मग हा पोलीस स्वतःच्या अस्तित्वाकरता काय करू शकत नाही हे महाराष्ट्र पोलिसांनी दाखवणे आता तरी गरजेचे आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शहर व ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचे क्वार्टर्स आहेत आणि तेथे हजारोच्या संख्येने पोलीस परिवार व त्यांचे नातेवाईक राहत आहेत आणि वर्षानुवर्षे आपण अनेक आमदारांना ओळखीच्या लोकांना नगरसेवक सरपंच आमदार खासदार बनवले आहेत पण आता खऱ्या अर्थाने जर तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचाच माणूस हा लोकप्रतिनिधी आमदार पोलीस आमदार म्हणून उभा करावा लागेल…आणि हे सर्व सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला तुमचे लोक तन मन आणि धन लावून उभे करावे लागेल त्यांचा सपोर्ट व्हावा लागेल. कायदा व सुव्यवस्था कुठेही मोडीत न काढता आपल्या परिवारातील लोकांना अपक्ष उभे करून त्यांना निवडून द्या तरच तुमचा उद्धार होईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचा लोकप्रतिनिधी सापडेल आणि तुमचे वर्षानुवर्ष रखडलेले प्रश्न तुमचा लोकप्रतिनिधी पोलीस आमदार मार्गी लावेल यात कुठलीही शंका नाही. आज महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे पण पोलिसांच्या प्रश्नाशी काही घेणेदेणे नाही, मग असे गृहमंत्री महाराष्ट्राला कोण्या कामाचे ज्यांना पोलिसांच्या प्रश्नांची काही घेणेदेणे नाही..पोलीस खात्याचा जर कोणाला गृहमंत्री व्हायचे असेल तर तो पोलीस खात्याचा जाण असणारा पोलिसांविषयी आस्था बाळगणारा आणि पोलिसांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवणारा मंत्री भेटला तरच पोलिसांचे प्रश्न मार्गी लागतील अन्यथा हे राजकारणी पोलिसांना नेहमीच बळीचे बकरी बनवणार आणि यांचे बळी घेण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. हे सर्व चित्र महाराष्ट्र पोलिसांना बदलायचे असेल तर आगामी 2024 या निवडणुकीमध्ये विधानसभा क्षेत्र निवडून आपले अपक्ष प्रतिनिधी उभे करून त्यांना पोलीस आमदार बनवण्याची जबाबदारी स्वतःवर घ्या तरच तुमचा उद्धार होऊ शकेल. खूप झाले आता बेभरोशाचे जगणे आता जर खऱ्या अर्थाने सन्मानाने आणि मान ताट करून जर पूर्ण नोकरी करायचे असेल तर तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या बाजूने लढणे आणि जिंकून येन गरजेचे आहे. आमचा कोणी वाली नाही आमच्यासाठी कोणी लढत नाही हे हे रडगाणे आता तुम्हाला बंद करावे लागेल आणि तुमचा प्रतिनिधी तुम्हालाच निवडून द्यावा लागेल. तुमच्या जीवावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनाही कळू द्या की पोलिस आणि पोलीस परिवाराची ताकद काय आहे. पोलीस जर आपल्या औकातीवर आले तर काय करू शकतात याचा धडा सर्व राज्यकर्त्यांना देणे आज तरी गरजेचे आहे. नाहीतर महाराष्ट्र पोलिसांनी स्वतःवर आणि स्वतःवर होत असलेल्या अन्यायावर यानंतर कधीही म्हणू नये की आमचा कोणी वाली नाही. कारण तो स्वतःच्या हक्क व अधिकार करता लढू शकत नाही स्वतःची हक्क व अधिकार मिळवून घेऊ शकत नाही त्याला दुसऱ्याला दोष देण्याचा आणि आमचा वाली कोणी नाही हे म्हणण्याचा अधिकार सुद्धा नाही. महाराष्ट्र पोलीस भयमुक्ता आणि चिंतामुक्त जगवायचा असेल, त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त करायचे असेल, तुमचा परिवार सुखाने नांदवायचा असेल तर तुमचा लोकप्रतिनिधी आमदार निवडून आलाच पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या…पोलिसांचा वाली हा पोलीसच होऊ शकतो हे आता तुम्हाला आता समजायला यायला पाहिजे पोलिसांबद्दल कोणीही काही भरडताना शंभर टक्के विचार करायला पाहिजे. आणि हे तेव्हा होईल जेव्हा तुम्ही एकजुटीने तुमचा आमदार पोलीस आमदार निवडून द्याल. मी निलेश नागोलकर महाराष्ट्र पोलीस प्रतिनिधी व सचिव राष्ट्र निर्माण संघटन नागपूर महाराष्ट्र पोलीस आतील तमाम पोलीस बांधव पोलीस परिवार पोलीस बॉईज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन सामाजिक संघटना यांना नम्र विनंती आव्हान करतो की महाराष्ट्र पोलिसांचे अस्तित्व स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी विधानसभा 2024 साठी स्वतःचे अपक्ष प्रतिनिधी उभे करून त्यांना पोलीस आमदार म्हणून निवडून द्या हीच आपल्याला नम्र विनंती व अपेक्षा आहे. यासाठी तुम्हाला तन मन आणि धन या तिन्ही गोष्टींची गरज पडणार आहे सर्वांनी आपापल्या सोयीने आपले लोकप्रतिनिधी निवडा आणि त्यांना निवडून देण्यासाठी 100% परिश्रम करा तरच तुमचे अस्तित्व खऱ्या अर्थाने कायम होईल आणि तुमचा विजय चौहुकडे दिसेल. राजकारण्यांनाही घाम फुटला पाहिजे पोलिसांकडे पाहून त्यांच्याकडून तुमचा सन्मान राखला गेला पाहिजे तुमच्याविरुद्ध कुठलेही अपशब्द वापरताना किंवा अपमान करताना त्यांनी शंभर टक्के विचार केला पाहिजे की यापुढे आपले काय होऊ शकते…सन्मान जगवण्यासाठी सन्मान मिळवता आला पाहिजे ही ही धडपड फक्त महाराष्ट्र पोलिसांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आहे उठा जागे व्हा आणि विधानसभा 2024 साठी आपले अपक्ष उमेदवार उभे करून त्यांना पोलीस आमदार म्हणून निवडून द्या…

आवाहन करणार महाराष्ट्र पोलीस प्रतिनिधी निलेश नागोलकर मागील बारा वर्षापासून पोलिसांच्या हक्क अधिकाऱ्याकरता काम करत आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांचा प्रतिनिधी आमदार तयार झालाच पाहिजे हे सर्व महाराष्ट्रातील पोलिस व पोलीस परिवारांना माझे आव्हान विनंती आणि याचना आहे….

निलेश नागोलकर – कार्याध्यक्ष महाराष्ट्र पोलीस परिवार व पोलीस मित्र न्याय हक्क संघर्ष समिती नागपूर महाराष्ट्र,