Home यवतमाळ अमोल कोमावार यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा.

अमोल कोमावार यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा.

165
यवतमाळ ( प्रतिनिधी ) – सन 2020 पासून अनेक तक्रारी पुराव्यासह करून त्याचबरोबर सुनावणी दरम्यान भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे दोष निश्चित झाल्यावर सुद्धा हेतूपुरस्सर त्यांच्यावर कारवाई केल्या जात नाही त्यामुळे अनेक मुद्द्यांवर तात्काळ कारवाई करण्याकरिता तक्रारदार अमोल ओम प्रकाश कोमावार ( व्हिसल ब्लोअर् ) यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ च्या प्रांगणात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की सन 2020 पासून अनेक तक्रारी पुरावे सुनावणी दरम्यान भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे दोष निश्चित केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केल्या जात नाही याउलट त्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खत पाणी घातल्या जात आहे. असे स्पष्ट निदर्शनात येत असल्यामुळे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट मंत्री महोदय, न्यायालय यांना लिखित तक्रारी देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत “आमरण उपोषण ” करणार असे जाहीर केले आहे.
यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषणाला बसणार असण्याची तक्रार जिल्हाधिकारी ,यवतमाळ यांना केलेली आहे, त्यानुसार खालील मुद्द्यावर तात्काळ कारवाई करण्याकरिता खालील मुद्दे.
1) वर्धा – यवतमाळ – नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयांच्या गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी यांच्यावर तात्काळ कारवाई
२) तहसील कार्यालय घाटंजी येथे सध्या कर्तव्यावर रुजू असलेल्या नायब तहसीलदार दिलीप राठोड यांच्यावर महाराष्ट्र अधिनियम 1966 च्या कलम 155 अंतर्गत केलेल्या बोगस आदेशांवर झालेला भ्रष्टाचार व स्वतःच्या पदाचा व कायद्यातील तरतुदीचा आपल्या फायद्यासाठी केलेल्या कसूर बाबत सक्तीची दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याकरिता तात्काळ आदेश.
3) तहसील कार्यालय घाटंजी येथे सध्या कर्तव्यावर रुजू असलेले दिलीप राठोड यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागितलेल्या माहितीला जाणून बुजून खोटी संभ्रम निर्माण करणारी माहिती देऊन शासन शासकीय अधिकारी व तक्रारदाराची दिशाभूल केल्याबाबत सी आर पी सी अंतर्गत तरतुदीनुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्याकरिता आदेशित करने.
४) परी. तात्कालीन उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय घाटंजी येथील गोपाळ देशपांडे यांच्या कार्यकाळात यांच्याकडून केलेले सर्व आदेश , कारवाई किंवा यांच्या अधिकार कक्षात येणारे सर्व विषय यांची सखोल वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याचे तात्काळ आदेश देण्यात यावे.
५) परी .मोहनीश शेलवटकर, तहसील कार्यालय घाटंजी येथे सध्या कर्तव्यावर असून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेले कारवाईचे सर्व दस्तावेज.
६) यवतमाळ तहसील अंतर्गत येणाऱ्या मौजे किन्ही भोयर बायपास येथील विकास परवानग्या व नैसर्गिक संपत्तीचा नाश याबाबत तात्काळ सखोल चौकशी करून दंडात्मक कारवाई.
७) आदिवासी पारधी समाजाच्या जमीन खरेदी प्रकरणातील यवतमाळ तहसील कर्मचारी केतन कांबळे व त्यांच्या इतर महसूल कर्मचारी अधिकारी सहकाऱ्यांनी केलेल्या कृत्याबाबत सखोल चौकशी व तात्काळ कारवाई.
८) घाटंजी तालुक्यातील मौजे बिलायता येथील जप्त केलेली व पंचनामा केलेली रेती चोरी प्रकरणाबाबत पुन्हा चौकशी व कारवाईचे आदेश.
९) विद्यमान जिल्हा खाणीकर्म अधिकारी यवतमाळ शिरीष नाईक यांच्यावर तक्रारदाराने केलेल्या तक्रारीबाबत सखोल वरिष्ठ स्तरावरून चौकशी व तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावे.
संबंधित सर्व मुद्द्यांवर तात्काळ चौकशी व कारवाईचे आदेश द्यावे. अन्यथा दिनांक ११/०३/२०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात “आमरण उपोषण ” करण्यात येत आहे. असे जाहीर केले त्याचबरोबर यातील तक्रारदार अमोल कोमावार यांनी सर्व राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांना तसेच पत्रकारांना आव्हान केलेले आहेत की होत असलेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत तात्काळ चौकशी करण्यात यावी तसेच सरकारी कर्मचारी यांचे भ्रष्टाचाराचे तसेच आर्थिक गैरव्यवहाराचे तसेच काळा पैसा बाबतचे लावलेले आरोप केलेल्या तक्रारी याबाबत तात्काळ पारदर्शकपणे सर्वासमक्ष चौकशी करण्याकरिता आवाज उचलावा व फक्त मंत्रालय मुंबई इथपर्यंतच नाही तर यवतमाळ येथील भ्रष्टाचाराचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र यावे व सर्वांनी मिळून एक मताने आपल्या राज्यासाठी, देशासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्यात सहभागी व्हावे.