Home विदर्भ राहुल आडे यांची घाटंजी तालुका युवासेना अधिकारी पदी निवड

राहुल आडे यांची घाटंजी तालुका युवासेना अधिकारी पदी निवड

110
0

आर्णी विधानसभा युवासेना अधिकारी पदी आकाश राठोड

यवतमाळ / घाटंजी –  राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या यात आर्णी विधानसभा युवासेना अधिकारी म्हणून आकाश राठोड तर घाटंजी तालुका युवासेना अधिकारी म्हणून राहुल आडे यांची नियुक्ती केली आहे.

पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिक कार्य करणारे आकाश राठोड व राहुल आडे हे सतत गोर गरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. ते नेहमी अन्याया विरूद्ध आपला लढा उभे करतात. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांचेवर विश्वास दाखवीत त्यांना पक्षात बढती देत त्यांची नियुक्ती करण्यात आली. हे दोघेही पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे निकवर्तीय मानले जाते. त्यांच्या नियुक्तीने घाटंजी तालुक्यातील शिवसैनिकात आनंद संचारला असून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पक्षाने आमच्यावर जो विश्वास टाकून जबाबदारी टाकली त्यावर आम्ही शिवसैनिक म्हणून नक्कीच उत्कृष्ट कार्य करू सर्वसामान्य जनतेसाठी, अन्यायाविरुद्ध लढा देत राहू व पक्षाशी प्रामाणिक राहून कार्य करू असे मनोगत व्यक्त केले.
नियुक्तीचे श्रेय मा.ना.संजयभाऊ राठोड (पालकमंत्री यवतमाळ) जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, विष्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड, प्रविन शिंदे, गजानन बेजंकिवार, निलेश चव्हाण, मनोज ढगले, रुपेश कल्यमवार यांना देण्यात आले आहे..