Home जळगाव भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी नुरुद्दीन मुल्लाजी

भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी नुरुद्दीन मुल्लाजी

131

रावेर (शरीफ शेख)

भारतीय पत्रकार महासंघ एरंडोल तालुका अध्यक्ष नूरुद्दीन मुल्लाजी यांची भारतीय पत्रकार महासंघाच्या कार्याध्यक्षपदी (ग्रामीण) नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांचे सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,सहकार क्षेत्रासह पत्रकारितेत उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे, जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिग राजपुत,जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे,सरचिटणीस संजीव शिरसाठ केंद्रीय उपाध्यक्ष, राकेश कोल्हे,जयवंत देवरे,प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार जैन,केंद्रीय सरचिटणीस प्रदीप पाटील,केंद्रीय सचिव प्रकाश कासार,एरंडोल तालुका अध्यक्ष नितीन ठक्कर,चोपडा तालुका अध्यक्ष गणेश बेहेरे,ग्रामीण तालुका अध्यक्ष निवृत्ती खैरनार, जिल्हा उपाध्यक्ष विश्राम तेले,जिल्हा उपाध्यक्ष (पश्चिम विभाग)नारायण साळुंखे,जिल्हा कार्याध्यक्ष (शहर)महेंद्र पाटील,चोपडा तालुका सरचिटणीस किरण देवराज,सह चिटणीस जितेंद्र कोळी,कोषाध्यक्ष राजेंद्र चौधरी,कार्याध्यक्ष रोहिदास मोरे,प्रवीण सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.