Home नांदेड माहूर येथील घनकचरा व्यवस्थापन नगर पंचायतमधील महिलांना ब्लँकेंटचे वाटप.

माहूर येथील घनकचरा व्यवस्थापन नगर पंचायतमधील महिलांना ब्लँकेंटचे वाटप.

149

मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर,दि : ७:- माहूर नगर पंचायत येथील घनकचरा व्यवस्थापन वरील महिलांना ब्लँकेंट चे वाटप करण्यात आले.
माहूर येथील नव्याने होत असलेल्या काँग्रेस भवन पक्ष कार्यालयाला माहूर येथील समाजसेवक हाजी कादरजी दोसाणी साहेब यांनी भेट दिली आणि काँग्रेस भवन पक्ष कार्यालयाची प्रशंशा करीत काँग्रेस भवन पक्ष कार्यालयाला ब्लॅंकेंट भेट दिली असता. व ते सर्व ब्लॅंकेंट नगरपंचायत मधील घनकचरा व्यवस्थापन मधील महिलांना नगरपंचायत च्या उपनगराध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती सौभाग्यवती अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे,यांच्या हस्ते ब्लॅंकेंटचे वाटप करण्यात आले.यावेळी काँग्रेस पक्षाचे जेस्ट आदिवासी नेते लक्ष्मणराव बेराडे व न.प.चे कर्मचारी गणेशभाऊ जाधव उपस्थित होते.