Home महत्वाची बातमी मोठ्या ग्रामपंचायतीला दहा लाखांचा निधी उपलब्ध करून देणार – माजी आमदार प्रा....

मोठ्या ग्रामपंचायतीला दहा लाखांचा निधी उपलब्ध करून देणार – माजी आमदार प्रा. राजु तोडसाम

90
0

पांढरकवडा येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य सत्कार.

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – आर्णी, घाटंजी व केळापूर या तालुक्यातील निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा पांढरकवडा येथे आयोजित करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे आयोजन आर्णी – केळापूरचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम व प्रिया शिंदे – तोडसाम यांनी केला होता.
👉🏿 पांढरकवडा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार प्रसंगी माजी आमदार प्रा. राजु तोडसाम म्हणाले की, आर्णी, घाटंजी व केळापूर तालुक्यातील आर्णी विधानसभा मतदार संघात आपल्या गटाचे बत्तीस ग्रामपंचायती निवडून आले, असून अनेक ग्रामपंचायती मध्ये तीन पेक्षा अधिक उमेदवार निवडून आले आहेत. परंतु; मोठ्या ग्रामपंचायतीला विकासात्मक कामें करण्यासाठी आपण दहा लाख रुपया पर्यंतचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन, प्रा. राजु तोडसाम यांनी दिले. या वेळी व्यासपीठावर प्रिया शिंदे – तोडसाम प्रामुख्याने उपस्थित होत्या.
👉🏿 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदु पंडीत, गणेश चव्हाण, विनय जाधव, सुरज जाधव, पंकज राठोड, निसार शेख, अक्षय ठाकरे, सुदाम मांडळे, बाळा सस्ते, राम पेगर्लावार, चिंटू रेकावार, जिवण चव्हाण, आकाश येवले, बाळु जाधव, रुपेश चौधरी आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला घाटंजी, आर्णी व केळापूर या आर्णी विधानसभा मतदार संघातील अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.