Home विदर्भ हाैशि कबड्डी असोसियेशन वर्धा तर्फे महिला व पुरुष जिल्हा निवळ चाचनीला सुरवात

हाैशि कबड्डी असोसियेशन वर्धा तर्फे महिला व पुरुष जिल्हा निवळ चाचनीला सुरवात

162

ईकबाल शेख

वर्धा.आर्वी तालुक्यातील अनेक हॉलीबॉल खेळाडूंनी ज्याप्रमाणे राज्य व राष्ट्रीय स्तरावर तालुक्याचे व शहराचे नाव मोठे केले त्याचप्रमाणे अशा स्पर्धेच्या आयोजनातून अनेक कबड्डी खेळाडू आपले व तालुक्याचे नाव उज्वल करतील असे आमदार दादाराव केचे यांनी वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशन द्वारे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी सब जूनियर, ज्युनियर व सीनियर महिला पुरुष निवड चाचणी व भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विश्वास व्यक्त केला.

उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी हौशी कबड्डी असोसिएशन वर्धा अध्यक्ष महेश भाऊ ठाकूर, संदीप काळे, आर्वी पंचायत समितीचे सभापती हनुमंत चरडे, गौरव जाजू, पद्माकर देशमुख, बावणे, गुड्डू गावंडे, धुळे इत्यादी उपस्थित होते.
निवड चाचणी करता अनेक खेळाडूंनी तसेच स्पर्धेकरता अनेक संघांनी नोंदणी केली आहे. दोन दिवसीय जिल्हास्तरीय निवड चाचणी मध्ये खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन कपिल ठाकूर यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अनिल चव्हाण, अजय कट्टम वार, शैलेश डफर, राहुल गोडबोले, राजाभाऊ गांडूळे , नितीन कदम इत्यादी प्रयत्न करीत